IPL 2025 Retention Delhi Capitals Team Players: आयपीएल रिटेन्शनमधील सगळ्यात चर्चित नाव म्हणजे विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत. ऋषभची आयपीएल कारकीर्द या संघाच्या माध्यमातूनच उभी राहिली आहे. पण आता मात्र दिल्ली संघाने ऋषभ पंतला संघातून रिलीज केलं आहे, जी मोठी बातमी आहे. अशारितीने गेले काही दिवस त्याला संघातून रिलीज करण्यात येईल ही चर्चा खरी ठरली आहे. महेंद्रसिंग धोनीचा वारसदार या दृष्टीने पंतकडे पाहिलं जातं. जीवघेण्या अपघातातून सावरत दमदार पुनरागमन करणाऱ्या ऋषभने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तडाखेबंद फटकेबाजी आणि उत्तम यष्टीरक्षण ही पंतची जमेची बाजू. या दोन्हीच्या बरोबरीने कर्णधारपदही भूषवत असल्याने ऋषभ हा आयपीएल मार्केटमधलं चलनी नाणं आहे. ऋषभला केंद्रस्थानी ठेऊनच अनेक वर्ष दिल्लीने संघरचना केली होती. मात्र आता दिल्ली संघव्यवस्थापनात मूलभूत बदल झाले आहेत. रिकी पॉन्टिंग, सौरव गांगुली यांच्याऐवजी हेमांग बदानी आणि वेणूगोपाळ राव यांनी कार्यभार स्वीकारला आहे. ऋषभने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करून मला लिलावात किती रक्कम मिळेल असं म्हटलं होतं. त्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. पंतसाठी अनेक संघ उत्सुक आहेत. ऋषभचं वय आणि क्षमता पाहता त्याच्यासारखा खेळाडू ताफ्यात असणं कोणत्याही संघासाठी फायदेशीर सौदा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – KKR IPL 2025 Retention: जेतेपद मिळवून देणाऱ्याला कर्णधाराला केकेआर सोडणार?


कुलदीप यादव आणि अक्षर पटेल हे फिरकीपटू दिल्लीच्या भविष्यकालीन योजनांचा भाग आहेत. यानुसार संघाने सर्वाधिक किंमत देत अष्टपैलू अक्षर पटेलला १६.५ कोटींना रिटेन केलं आहे. ट्रिस्टन स्टब्स हा दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू दिल्लीसाठी उज्वल भविष्य आहे आणि त्यालाही संघाने १० कोटींना रिटेन केलं आहे. पंत दुखापतग्रस्त असताना अभिषेक पोरेलने आपल्या खेळाने छाप उमटवली होती आणि यामुळेच त्यालाही संघाने ४ कोटींना रिटेन केलं आहे. तर कुलदीप यादवची फिरकीची जादू तर सर्वच जाणतात, त्यालाही संघाने १३.५ कोटींना रिटेन केलं आहे.

DC Retained Players: रिटेन केलेले खेळाडू

कुलदीप यादव – १३ २५ कोटी
अक्षर पटेल – १६.५ कोटी
ट्रिस्टन स्टब्स – १० कोटी
अभिषेक पोरेल – ४ कोटी

दिल्ली कॅपिटल्स रिलीज केलेले खेळाडू-

ऋषभ पंत, रिकी भुई, स्वस्तिक चिकारा, यश धूल, जेक फ्रेझर मॅकगर्क, शे होप, कुमार कुशाग्र, पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, हॅरी ब्रूक, ललित यादव, मिचेल मार्श, सुमीत कुमार, खलील अहमद, प्रवीण दुबे, मुकेश कुमार, अँनरिक नॉर्किया, विकी ओत्सवाल, रसिख सलाम, झाय रिचर्डसन, इशांत शर्मा, लिझाड विलियम्स, लुंगी एन्गिडी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 retention delhi capitals dc team players list rishabh pant kuldeep yadav akshar patel prithvi shaw tristan stubbs bdg