कुलदीप यादव हा सध्या भारतीय संघामध्ये असणारा एकमेव चायनामॅन गोलंदाज आहे. १४ डिसेंबर १९९४ रोजी त्याचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला. २०१४ मध्ये अंडर १९ क्रिकेट विश्वचषकामध्ये त्याचा समावेश करण्याक आला होता. विश्वचषक स्पर्धेमध्ये स्कॉटलंड संघाविरुद्ध हॅटट्रीक घेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१७ मध्ये त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या प्रकारांमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायला सुरुवात केली. त्याआधी ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली, परंतु एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल २०१२ मध्ये तो मुंबईच्या संघामध्ये होता. त्यानंतर २०१४ पासून त्याने कोलकाता संघाकडून खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०२२ मध्ये दिल्लीने बोली लावत त्याला संघामध्ये घेतले. कोलकातामध्ये असताना एका हंगामासाठी त्याला एकाही सामन्यामध्ये सहभागी न केल्याचे त्याने सांगितले होते. सध्या कुलदीप भारतीय संघाचा भाग आहे. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या गोलंदाजांच्या जोडीला कुलचा असे म्हटले जाते.Read More
Ricky Ponting advice to Kuldeep Yadav: दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला. मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने ड्रेसिंग…
Kuldeep Yadav with Yuzvendra Chahal: ईडन गार्डन्स, कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर कुलदीप यादवची युजवेंद्र चहलने ‘चहल’ टीव्हीवर…
बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात पाच विकेट्स घेताना कुलदीपने अश्विन-कुंबळे यांचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याचबरोबर चट्टोग्राममध्ये अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज…