Arjun Tendulkar’s leg injury after Nicholas Pooran hit two consecutive sixes : आयपीएल २०२४ तरुणांसाठी सुवर्णसंधीपेक्षा कमी नाही. १७ मे रोजी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले लखनऊ आणि मुंबईचे संघ आयपीएल २०२४ चा शेवटचा सामना खेळत आहेत. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरलाही खेळण्याची संधी मिळाली. या मोसमात अर्जुन पहिल्यांदाच मैदानात उतरला होता. ज्याची लखनऊ सुपर जायंट्ससाठी वादळी अर्धशतक झळकावणाऱ्या निकोलस पूरनने सलग दोन षटकार मारत धुलाई केली. २ चेंडूंवर २ षटकार बसल्यावर अर्जुन तेंडुलकर दुखापतीमुळे तंबूत परतला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अर्जुन तेंडुलकरला सोडावे लागले मैदान –

निकोलस पुरनने एकट्याने लखनऊचा संथ डाव सुपरफास्ट केला. पूरण जेव्हा क्रिजवर उतरला तेव्हा लखनऊची धावसंख्या ९.३ षटकात ६९ धावा होती. यानंतर पूरणने अशी फलंदाजी केली की सगळे पाहतच राहिले. १३व्या ते १५व्या षटकांदरम्यान पुरणने लखनऊचा डाव बुलेट ट्रेनमध्ये बदलला. या कालावधीत या खेळाडूने १२ चेंडूत ६ षटकार ठोकले. त्यापैकी अर्जुन तेंडुलकरच्या चेंडूवर त्याने २ षटकार ठोकले. पुरणच्या स्फोटक फलंदाजीदरम्यान अर्जुन तेंडुलकर जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. वास्तविक, गोलंदाजी करताना अर्जुनच्या स्नायूंना ताण आला आणि हा खेळाडू सामन्यात केवळ २.२षटके टाकू शकला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. अगदी पहिल्याच षटकात अर्जुनला जवळपास विकेट मिळाली होती, त्यानंतर त्याने जोरात सेलिब्रेशन केले पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण त्याचा चेंडू मार्कस स्टॉइनिसचा चेंडू पॅडला लागला होता. अर्जुनने जोरात अपील केली होती, त्यानंतर अंपायरने बोट वर केले. पण स्टोइनिसने यासाठी रिव्ह्यू घेतला, ज्यावरून स्टॉइनिस नाबाद असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या ओव्हरमध्ये अर्जुन स्टॉइनिसला खुन्नस देताना दिसला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाययरल होत आहे.

हेही वाचा – दिनेश कार्तिक आयपीएल २०२५ मध्ये CSK च्या ताफ्यात जाणार? सोशल मीडियावर ऋतुराजबरोबर चर्चा, स्टोरी व्हायरल

निकोलस पुरनबद्दल बोलायचे तर, या खेळाडूने १९ चेंडूत अर्धशतक झळकावून आणखी एक विशेष टप्पा गाठला. पुरणने तिसऱ्यांदा आयपीएलमध्ये २० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्यांच्या आधी जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि ट्रॅव्हिस हेड यांनी हे काम केले होते. मात्र, त्याच्या या झंझावाती खेळीदरम्यान पूरणला त्याचाच विक्रम मोडता आला नाही. लखनऊसाठी पुरणने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले आहे. गेल्या वर्षी त्याने आरसीबीविरुद्ध १५ चेंडूत अर्धशतक केले होते. यावेळी त्याने आणखी चार चेंडू खेळले. यानंतर निकोलस पुरनने अवघ्या २९ चेंडूंत ५ चौकार आणि ८षटकारांच्या मदतीने ७५धावांची खेळी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले.