BCCI announces revised IPL 2025 schedule : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन क्रिकेट लीग २०२५ स्पर्धा आठवडाभरासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर एकमत झाल्यानंतर ही स्पर्धा पु्न्हा सुरू केला जात आहे. बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू झाल्याची घोषणा केली आहे. वृत्तसंस्था इएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. १७ मे पासून आयपीएलचे सामने पुन्हा खेळवले जाणार आहेत, तर ३ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.

या कालावधीत १७ सामने ६ ठिकाणी खेळवले जातील. या सुधारित वेळापत्राकात दोन डबल हेडर सामन्यांचा समावेश आहे, जे दोन रविवारी खेळवले जाणार आहेत.

आयपीएल २०२५ स्पर्धेतील एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत.   त्यापैकी ५८ सामने पूर्ण झाले आहेत. तर १६ सामने अजूनही शिल्लक आहेत. ज्यात प्लेऑफच्या सामन्यांसह फायनलचा देखील समावेश आहे. या स्पर्धेतील फायनलचा सामना २५ मे रोजी होणार होता, पण आता सुधारित वेळापत्रकानुसार अंतिम सामना हा ३ जून रोजी होणार आहे.

समाने कुठे होणार

फ्लेऑफचं वेळापत्रक

क्वालिफायर १ : २९ मे
एलिमिनेटर : ३० मे
क्वालिफायर २ : १ जून
अंतिम सामना : ३ जून