Rohit Shama Clean Bold Video Viral : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा ४२ वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. यशस्वी जैस्वालच्या वादळी शतकाच्या जोरावर राजस्थानने मुंबईला २१३ धावांचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर मुंबईचा सलामीवीर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले. पहिल्या षटकात चांगली सुरुवात केल्यानंतर संदीप शर्माच्या गोलंदाजीवर मुंबईला मोठा धक्का बसला. कारण रोहित शर्माला संदीप शर्माने तीन धावांवर क्लीन बोल्ड केलं.

परंतु, व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून बर्थ डे बॉय रोहित शर्मा बाद झाला नसल्याचं समोर आलं आहे. विकेटकीपर संजू सॅमसनच्या ग्लोव्हजा स्टंपला स्पर्श झाल्याने बेल्स खाली पडल्या, असं ट्वीटरवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळं रोहित शर्मा बाद झाल्यानं वाढदिवशीच रोहितला भन्नाट गिफ्ट मिळालं, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

नक्की वाचा – एकटा टायगर! वानखेडे मैदानात मुंबई इंडियन्सविरोधात जैस्वालची ‘यशस्वी’ खेळी, आयपीएलमध्ये ठोकलं पहिलं शतक

इथे पाहा व्हिडीओ

राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरला. एरव्ही धडाकेबाज फलंदाजी करणारा बटलर आजच्या सामन्यात धावांसाठी संघर्ष करताना दिसला. पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर बटलर १८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर यशस्वी जैस्वालने वानखेडे मैदानात धावांचा पाऊस पाडला. मैदानात चारही दिशेला मोठे फटके मारून जैस्वालन मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जैस्वालने ६२ चेंडूत ८ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीनं १२४ धावा कुटल्या.