महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्ज…आयपीएलधे हे समीकरण आता प्रत्येकाच्या मनावर कोरलं केलं आहे. पहिल्या हंगामापासून चेन्नईचं प्रतिनिधीत्व करणारा धोनी हा संघातला महत्वाचा खेळाडू मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेली असली तरीही पुढचे काही हंगाम तो आयपीएल खेळत राहणार आहे. परंतू २००८ साली आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा लिलाव पार पडला, त्यावेळी महेंद्रसिंह धोनी हा CSK संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती नव्हता. CSK चा माजी खेळाडू सुब्रमण्यम बद्रीनाथने यु-ट्यूब चॅनलवर बोलत असताना याबद्दल माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – Video : सरावादरम्यान धोनीने मारलेला सिक्स थेट मैदानाबाहेर, मुरली विजयही झाला अवाक

“चेन्नईचं संघ व्यवस्थापन २००८ च्या लिलावाआधी विरेंद्र सेहवागला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक होतं. परंतू सेहवागने याला नकार देत, मी दिल्लीत लहानाचा मोठा झाल्यामुळे मला दिल्लीकडून खेळायला आवडेल असं सांगितलं होतं. सेहवागच्या या निर्णयानंतर CSK ने धोनीला आपल्या संघात स्थान देऊन प्रमूख खेळाडूची भूमिका दिली. खरं पहायला गेलं तर त्यादरम्यान धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन काही कालावधीच लोटला होता. परंतू २००७ टी-२० विश्वचषकात धोनीची कामगिरी पाहिल्यानंतर CSK ने धोनीला आपल्या संघात घेण्याचं ठरवलं.”

IPL च्या तेराव्या हंगामासाठी आता सर्व संघ सज्ज झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून युएईत स्पर्धेला सुरुवात होणार असून चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार असल्यामुळे त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असणार आहेत.

अवश्य वाचा – IPL 2020 : दिपक चहरला BCCI कडून सरावाची परवानगी

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk wanted virender sehwag instead of ms dhoni initially says subramaniam badrinath psd