आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात झाली आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपला पहिला सामना खेळताना सनराईजर्स हैदराबादवर १० धावांनी मात केली. जॉनी बेअरस्टो आणि मनिष पांडे यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे सामना हैदराबाद सहज जिंकेल असं वाटत असतानाच, युजवेंद्र चहलने एकाच षटकात दोन बळी घेत सामन्याचं पारडं बंगळुरुच्या दिशेने झुकवलं. पहिल्यांदा बेअरस्टो आणि नंतर विजय शंकरला माघारी धाडत चहलने हैदराबादला धक्का दिला.

या दोन विकेटनंतर हैदराबादच्या डावाची घसरगुंडी उडाली. चहलला या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. युजवेंद्र चहलची होणारी बायको धनश्री वर्माने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मिळालेला पुरस्कार आपल्या खास स्टाईलमध्ये सेलिब्रेट केला आहे. चहलला पुरस्कार मिळाल्यावर पाहा कशी खुश झाली धनश्री वर्मा…

आयपीएलसाठी रवाना होण्याआधी धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचा भारतात पारंपरिक पद्धतीने साखरपुडा पार पडला. धनश्री वर्मा ही एक मॉडेल आणि कोरिओग्राफर आहे. दोघांचाही साखरपुडा झाल्यानंतर सोशल मीडियावर धनश्री-चहल ही जोडी चांगलीच सक्रीय असते.