Dhawal Kulkarni Viral Video: आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी आपल्या वाढदिवसाची पार्टी दिली. रोहितचा वाढदिवस ३० एप्रिलला आहे, पण त्या दिवशी मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सशी सामना आहे, त्यामुळे रोहितने त्याच्या वाढदिवसाची पार्टी मुंबईतील वरळी येथे अगोदर आयोजित केली होती. रोहितच्या पार्टीला मुंबई इंडियन्सचे सर्व क्रिकेटर्स पोहोचले. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा धवल कुलकर्णीही त्याच्या पार्टीला पोहोचला, मात्र त्याच्या एन्ट्रीमुळे तो एका नव्या वादात सापडला आहे.

वास्तविक, जेव्हा धवल कुलकर्णी रोहितच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला तेव्हा एक घटना घडली. ज्यामुळे धवल कुलकर्णी ट्रोल होत आहे. धवलच्या एन्ट्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. धवल कुलकर्णी पार्टीत पोहोचल्यावर अचानक एक मुलगी रस्त्यावर पडल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. आजूबाजूचे लोक मुलीच्या मदतीसाठी पुढे सरसावतात, पण पुढे जाण्याऐवजी धवल कुलकर्णी त्याच्या फोटो सेशनमध्ये व्यस्त होतो.

लोकांनी व्यक्त केली नाराजी –

व्हिडीओमध्ये धवल कुलकर्णी ब्लॅक प्रिंटेड शर्ट आणि ब्लू जीन्स परिधान करून कार्यक्रमस्थळी पोहोचला आहे. त्याच्या प्रवेशाच्या वेळी, एक मुलगी अचानक गेटसमोर पडते. इतरांप्रमाणे धवल कुलकर्णीलाही मुलगी पडताना दिसली, पण तिला मदत करण्यासाठी पुढे जाण्याऐवजी तो तिथेच उभा राहिला आणि फोटो सेशनमध्ये व्यस्त झाला. त्याचवेळी मुलीला सांभाळण्यासाठी २-३ जण तिथे जातात. धवलच्या या वृत्तीवर लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत आणि त्याला वाईट व्यक्ती म्हणत आहेत.

हेही वाचा – IPL 2023 PBKS vs LSG: पंजाब-लखनऊ सामन्यानंतर गौतम गंभीरचा VIDEO व्हायरल, चाहत्यांसह समालोचकही झाले चकीत

व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया –

धवल कुलकर्णीच्या या व्हिडिओवर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “त्याला महिलांचा आदर नाही.” त्याचवेळी, दुसर्‍या युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, “जर एखादी मुलगी किंवा मुलगा पडला तर त्यांना उचलले पाहिजे, परंतु तो फोटो काढत आहे. दुसर्‍या युजरने लिहिले, “त्याच्यात माणुसकी नाही आणि पडणाऱ्या महिलेबद्दल आदरही नाही.”