यंदाच्या आयपीएल मध्ये आरसीबीचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी फारच सुमार दर्जाची राहिली. ज्याचा संघाला वेळोवेळी फटका बसला. ग्लेन मॅक्सवेल हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाचा सर्वात मोठा दोषी मानला जात आहे. जेव्हा आरसीबी राजस्थान रॉयल्स विरुद्ध एलिमिनेटर सामना खेळत होते, तेव्हा आरसीबीची सुरुवात चांगली झाली खरी पण संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. सातत्याने विकेट पडल्यानंतर चाहत्यांच्या नजरा ग्लेन मॅक्सवेलवर खिळल्या होत्या. आता मॅक्सवेल नक्कीच चांगला खेळेल अशी चाहत्यांना आशा होती, पण या सामन्यातही मॅक्सवेल फ्लॉप ठरला.

आऱसीबी ९७ धावांवर ३ विकेट गमावून खेळत होती. समोर आश्विन गोलंदाजी करत होता. अश्विनच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने षटाकारासाठी चेंडू उडवला खरा पण ध्रुव जुरेलने त्याचा सहज झेल टिपला. मॅक्सवेलने नेमका कोणता शॉट खेळला हे पाहून सगळेच चकित झाले. संघाचे दोन्ही बडे फलंदाज लागोपाठ बाद झाल्याने आऱसीबीला मोठा फटका बसला, त्याचसोबत हे दोन विकेटही सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले. आऱसीबीने शेवटी १७२ धावांचा टप्पा गाठला.

या धावसंख्येचा बचाव करत असतानाच पहिली विकेट मिळवण्याची संधी पॉवरप्लेमध्येच संघाला मिळाली. मॅक्सवेल सीमारेषेपवर क्षेत्ररक्षण करत होता. कोहलर कॅडमोरने षटकार लगावत मोठा फटका खेळला खरा पण तो मॅक्सवेलच्या दिशेने आला आणि मॅक्सवेलने हा मोठा झेल सोडला. ज्यामुळे या दोघांनी पॉवरप्लेमध्ये चांगल्याच धावा चोपल्या.

आता आरसीबीने संघाच्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओच्या सुरूवातीलाच मॅक्सवेल ड्रेसिंग रूमच्या दरवाज्यावर रागाने हात मारताना दिसला. त्याच्या या प्रतिक्रियेवरूनही आणि एलिमिनेटर सामन्यातील एकंदरीत कामगिरीवरून चाहत्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं. मॅक्सवेल यंदाच्या मोसमात ४ वेळा गोल्डन डक वर बाद झाला. यावरूनही त्याला चांगलंच सुनावलं तर त्याने सोडलेला झेलमुळेही तो चाहत्यांच्या निशाण्यावर आहे.

आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेलवर खूप विश्वास होता. मॅक्सवेल फॉर्मात नव्हता, तरीही त्याला सतत संधी दिली जात होती, कारण मॅक्सवेल हा स्फोटक फलंदाज आहे. मॅक्सवेल चालला असता तर तो एकट्याने गोलंदाजांचा नाश करू शकला असता. मधल्या काळात मॅक्सवेललाही काही सामन्यांसाठी वगळण्यात आले. दरम्यान, मॅक्सवेलच्या जागी रीस ट्रॉपलला संघाचा भाग बनवण्यात आले.

मॅक्सवेल फॉर्मात नसतानाही आरसीबीने त्याला सतत संधी दिली, कारण मॅक्सवेल हा स्फोटक फलंदाज आहे. मॅक्सवेलची बॅट एलिमिनेटर सामन्यात चालली असती तर तो एकटाच गोलंदाजांवर भारी पडला असता. आयपीएलच्या मध्यात मॅक्सवेललाही काही सामन्यांसाठी वगळण्यात आले. दरम्यान, मॅक्सवेलच्या जागी रीस टोप्लेला संघाचा भाग बनवण्यात आले. टॉप्लेने शानदार कामगिरी करत आरसीबीला प्लेऑफमध्ये नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, पण चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो आपल्या देशात परतला. यानंतर मॅक्सवेलला पुन्हा संधी देण्यात आली, पण पुनरागमन करूनही मॅक्सवेल फ्लॉपच राहिला.