Lucknow Super Kings vs Royal Challengers Bangalore, IPL Today Match Updates: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) आणि लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या १५ व्या सामन्यात स्टेडियममध्ये अचानक घारीची एन्ट्री झाली. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमध्ये घार अचानक आल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला. मार्क वुडलाही गोलंदाजी करता आली नाही. येथे, घारीची शिकार हुकली, परंतु वुडने त्याच्या या षटकात मॅक्सवेलची शिकार केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेवटच्या षटकात दिसले हे दृश्य –

शेवटच्या षटकात हे दृश्य दिसले. शेवटच्या षटकाचा दुसरा चेंडू टाकण्यासाठी मार्क वुड येताच त्याने अचानक धावणे थांबवले. इकडे बॅट घेऊन सज्ज असलेला मॅक्सवेलही थक्क झाला. जेव्हा वुडने गोलंदाजी केली नाही, तेव्हा मॅक्सवेल हसू लागला. पण वुड का थांबला कुणालाच कळाले नाही. नंतर कॅमेरापर्सनी दाखवले की वुडला घारेमुळे गोलंदाजी करायला अडथळा आला होता. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वास्तविक, घार आपल्या भक्ष्यामुळे इकडे-तिकडे धावत होती, तरी ती आपली शिकार पकडू शकली नाही. विराट कोहलीच्या फलंदाजीच्या वेळीही ही घार इकडे तिकडे उडताना दिसत होती.

वुडने मॅक्सवेलची शिकार केली –

मात्र, घार बाहेर गेल्यानंतर मार्क वुडने पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलची शिकार केली. वुडच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेलचा स्टंप उडून गेला. ताशी १५० किलोमीटर वेगाने फेकण्यात आलेल्या या चेंडूने मॅक्सवेलला काहीच कळाले नाही. मॅक्सीने या सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने २९ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकार लगावत ५९ धावा केल्या.

पहिल्या गड्यासाठी ९६ धावांची शानदार भागीदारी –

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी आरसीबीसाठी दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९६ धावांची शानदार भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली ६१ धावा करुन बाद झाला. त्याने ४४ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the lsg vs rcb live match the game was stopped due to the sudden appearance of an eagle vbm