Dream11 IPL 2020 UAE: सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. २०१८पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली. सौरभ तिवारीच्या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू (७१) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५८) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. ४८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार खेचत ७१ धावा करणाऱ्या अंबाती रायडूला सामनावीर घोषित करण्यात आले.
१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ मुरली विजयही पायचीत झाला. मलिंगाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेम्स पॅटिन्सनने अवघ्या एका धावेवर त्याला बाद केले. शेन वॉटसन (५) आणि मुरली विजय (१) हे दोघे स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. अनुभवी अंबाती रायडूने संयमी खेळ करत ३३ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. अतिशय भक्कम अशी डु प्लेसिस-रायडू यांची भागीदारी अखेर राहुल चहरने तोडली. रायडू ७१ धावांवर झेलबाद झाला. जाडेजाही १० धावांत बाद झाला. त्यानंतर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या.
Bahubali Returns! #WhistleFromHome #WhistlePodu #Yellove #MIvCSK pic.twitter.com/eoIUK0wFK9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 19, 2020
तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण पॉवरप्लेचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात रोहित (१२) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही माघारी परतला. ५ चौकारांसह त्याने २० चेंडूत ३३ धावा केल्या. सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो १७ धावांवर बाद झाला. दमदार फलंदाजी करणारा सौरभ तिवारीदेखील ३१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. हार्दिक पांड्याने केवळ १४ धावा केल्या. कृणाल पांड्याही ३ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. उत्तुंग षटकार लगावण्याची क्षमता असलेला पोलार्ड १८ धावांवर माघारी गेला. नंतर पॅटिन्सनदेखील ११ धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईला २० षटकात ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
Highlights
कà¥à¤µà¤¿à¤‚टन डी कॉकचा दणका
???????? ??????? ?? ????? ?????????????? ???????? ?????? ??????? ????. ??????? ??? ????????? ?? ????? ???? ?????? ?? ???? ??????. ????? ? ????????? ?????? ????.
पाहा मà¥à¤‚बईचा संपूरà¥à¤£ संघ
????? ????? (???????), ???????? ??????, ??????? ?????, ?????? ???, ???? ??????, ??????? ??????, ??? ????????, ???? ?????? ????, ?????? ?????, ???? ????, ?????????? ????, ????? ???????, ????? ???????, ????? ????, ????? ???, ??????? ???????, ?????? ????????, ?????????? ????, ?????? ???, ????? ??????????, ?????? ????? ??? ????, ?????? ???, ???? ????
डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या. २०१८पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली.
धोनीच्या आधी फलंदाजीला आलेल्या रविंद्र जाडेजाने ५ चेंडूत १० धावा केल्या होत्या, पण त्याला कृणाल पांड्याने पायचीत केले.
अतिशय भक्कम अशी डु प्लेसिस-रायडू यांची भागीदारी अखेर राहुल चहरने तोडली. रायडू ७१ धावांवर झेलबाद झाला. चहरच्या विचित्र बॉलिंग अॅक्शनमुळे रायडूने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो बाद झाला.
अनुभवी अंबाती रायडूने संयमी खेळ करत ३३ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले.
शेन वॉटसन (५) आणि मुरली विजय (१) हे दोघे स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं.
मलिंगाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेम्स पॅटिन्सनने मुरली विजयला पायचीत केले. अवघ्या एका धावेवर असताना तो बाद झाला आणि चेन्नईला दुसरा धक्का बसला.
दिल्लीच्या संघाकडून घेतलेल्या ट्रेंट बोल्टने मुंबईला पहिल्याच षटकात बळी मिळवून दिला. अतिशय अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन ५ धावांवर माघारी परतला.
मुंबईच्या फटकेबाजीला गोलंदाजांनी लावला चाप; चेन्नईपुढे १६३ धावांचं आव्हान
अखेरच्या काही षटकात चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्यात 'कमबॅक' केलं आणि मुंबईच्या डावाची घसरण सुरू झाली. उत्तुंग षटकार लगावण्याची क्षमता असलेला पोलार्ड १८ धावांवर माघारी गेला. नंतर पॅटिन्सनदेखील ११ धावांवर बाद झाला.
कृणाल पांड्याकडून मोठ्या फटक्यांची चाहत्यांना अपेक्षा असताना तो मात्र स्वस्तात माघारी परतला. ३ चेंडूत ३ धावा करून तो बाद झाला.
भरवशाचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्या षटकार खेचण्याच्या नादात बाद झाला. एकाच षटकात दुसऱ्यांदा सीमारेषेवर आपली करामत दाखलत डु प्लेसिसची झेल टिपला आणि हार्दिक पांड्याला माघारी धाडले. हार्दिकने १० चेंडूत २ षटकारांसह १४ धावा केल्या.
दमदार फलंदाजी करणाऱ्या सौरभ तिवारीचा सीमारेषेवर डु प्लेसिसचा अप्रतिम झेल टिपला आणि सौरभ तिवारी बाद झाला. त्याने ३१ चेंडूत ४२ धावा केल्या.
पियुष चावलाने टाकलेला चेंडू सौरभ तिवारीच्या पॅडला लागला. त्यामुळे चावलाने अपील केले पण पंचांनी त्याला नाबाद ठरवलं. त्यानंतर चावलाच्या म्हणण्यानुसार धोनीने DRS घेतला पण तो फसला आणि तिवारी नाबाद राहिला.
IPL 2020 : सुरुवातच दणक्यात ! पहिल्याच चेंडूवर 'हिटमॅन'चा विक्रमी चौकार
IPL 2020 : रोहितचा बळी आणि पियुष चावलाचं मानाच्या यादीत प्रमोशन
सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच सूर्यकुमार यादव बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या नादात तो १७ धावांवर बाद झाला. त्याने २ चौकार मारले.
१० षटकांनंतर मुंबई - २ बाद ८६
रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर डावखुऱ्या सौरभ तिवारीने IPL 2020 हंगामातील पहिला षटकार लगावला.
दमदार सुरूवात केल्यानंतर रोहितपाठोपाठ क्विंटन डी कॉकही माघारी परतला. ५ चौकारांसह त्याने २० चेंडूत ३३ धावा कुटल्या, पण सॅम करनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने २ चौकारांसह चांगली सुरूवात केली होती. पण पॉवरप्लेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने त्याने हवेत चेंडू टोलवला आणि तो झेलबाद झाला. त्याने १० चेंडूत १२ धावा केल्या.
सलामीवीर क्विंटन डी कॉकने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करायला सुरूवात केली. पहिल्या चार षटकांपैकी १६ चेंडू खेळत त्याने ३१ धावा केल्या. त्यात ५ चौकारांचा समावेश होता.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने हंगामाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून दमदार सुरूवात केली. तर त्याच षटकात क्विंटन डी कॉकनेही चौकार लगावला.
मुंबई इंडियन्स: क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्य़कुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
चेन्नई सुपर किंग्ज : मुरली विजय, वॉटसन, फाफ डू प्लेसीस, रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जाडेजा, सॅम करन, दीपक चहर, पियुष चावला, लुंगी एन्गीडी
मुंबई आणि चेन्नई ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत २८ वेळा आमनेसामने आले असून मुंबईने १७, तर चेन्नईने ११ सामने जिंकले आहेत. गेल्या पाच लढतीत मुंबईने विजय मिळवला आहे. यामध्ये २०१८मधील एक, तर २०१९मधील चार (दोन साखळी, एक बाद आणि अंतिम फेरी) लढतींचा समावेश आहे. सलामीच्या सामन्यात आतापर्यंत तीन वेळा मुंबई-चेन्नई एकमेकांसमोर आले आहेत. यापैंकी मुंबईने दोन, तर चेन्नईने एक लढत जिंकली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्विंटन डिकॉक, आदित्य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नाथन कूल्टर नाइल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कुणाल पांड्या, कायरन पोलार्ड, राहुल चाहर, क्रीस लीन, हार्दिक पांड्या, शेरफने रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिशेल मॅक्लिनेगन, प्रिंस बलवंत राय सिंह, अनुकूल रॉय, इशान किशन
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फैफ डु प्लेसी, इम्रान ताहिर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगिडी, मिशेल सँटनर, मोनू कुमार, मुरली विजय, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दुल ठाकूर, सॅम करन, पीयूष चावला, जोश हेजलवूड, आर. किशोर
संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी १ या वाहिन्यांवर हा सामना पाहता येईल. शिवाय Disney+Hotstar VIP वरही ऑनलाइन सामना पाहता येणार आहे.