आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. यंदा भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता स्पर्धेचं आयोजन युएईत करण्यात येणार आहे. युएईमधील खेळपट्ट्यांमुळे यंदा प्रत्येक संघाला विजयाची समान संधी आहे. यंदाच्या हंगामात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत प्रत्येक सामन्यात समीकरणं बदललेली पहायला मिळू शकतील. युएईत Spinner Friendly Wicket वर यंदा फिरकीपटूंकडून संघांना अनेक अपेक्षा असणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्या संघाकडे सर्वात चांगले फिरकीपटू आहेत याचा घेतलेला हा आढावा…