युएईत शारजाच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईच्या गोलंदाजांची पिसं काढली. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने २१६ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकर यशस्वी जैस्वालने आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. नाणेफेक झाल्यानंतर जैस्वालने चेन्नईचा कर्णधार धोनीची भेट घेऊन हात जोडत त्याचे आशिर्वाद घेतले.
धोनीनेही यशस्वीसोबत हात मिळवत त्याला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
— Dhoni Fan (@mscsk7) September 22, 2020
सलामीचा सामना खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालकडून अनेकांना खूप अपेक्षा होत्या. परंतू पहिल्याच सामन्यात केवळ ६ धावा काढून तो माघारी परतला.