IPL 2022, LSG vs RCB Eliminator Highlights : आयपीएल २०२२ या पर्वामध्ये आज एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत झाली. या सामन्यात बंगळुरुचा विजय झाला. तर लखनऊ संघाचा १४ धावांनी पराभव झाला. या विजयासह बंगळुरु संघाने क्वॉलिफायर-२ मध्ये धडक मारली असून येथे हा संघ राजस्थान रॉयल्सशी दोन हात करेल.
IPL 2022, LSG vs RCB Eliminator Live Updates : लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील एलिमिनेटर सामन्याचे प्रत्येक अपडेट एका क्लीकवर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनऊवर थरारक विजय मिळवला आहे. बंगळुरुने एलिमिनेटर हा सामना १४ धावांनी आपल्या नावावर केले आहे. तर पराभवानंतर लखनऊ संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
जोस हेझलवूडने दोन चेंडूमध्ये सलग दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्याने केएल राहुल आणि कृणाल पांड्या या आघाडीच्या फलंदाजांना तंबुत पाठवलं आहे.
लखनऊ सुपर जायंट्सला मार्कस सॉईनिसच्या रुपात चौथा झटका बसला आहे. मार्कस स्टॉईनिसने अवघ्या ९ धावा केल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सला दीपक हुडाच्या रुपात तिसरा झटका बसला आहे. सध्या लखनऊच्या १४४ धावा झाल्या आहेत. केएल राहुल अजूनही मैदानात फलंदाजी करतोय.
लखनऊ सुपर जायंट्सच्या सध्या १२५ धावा झाल्या आहेत. अजूनही लखनऊला ३६ चेंडूंमध्ये ८३ धावांची गरज आहे.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल धडाकेबाज फलंदाजी करत असून त्याने आतापर्यंत अर्धशतकी खेळी केली आहे. सध्या राहुलच्या ५७ धावा झाल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स संघाचे केएल राहुल आणि दीपक हुडा या फलंदाजांनी मैदानावर पाय रोवले आहेत. सध्या लखनऊच्या संघाच्या ११२ धावा झाल्या आहेत. लखनऊला ४७ चेंडूमध्ये १०५ धावा करायच्या आहेत.
लखनऊ संघाला मनन वोहराच्या रुपात दुसरा मोठा झटका बसला आहे. सध्या लखनऊच्या ४१ धावा झाल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स संघला क्विंटन डी कॉकच्या रुपात पहिला झटका बसला आहे. डिकॉक फक्त सहा धावा करु शकला.
बंगळुरु संघाने वीस षटकात २०८ धावा केल्या आहेत. रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी धमाकेदार फलंदाजी केली. या दोघांच्या मदतीने बंगळुरु संघ ही धावसंख्या उभी करु शकला आहे.
दिनेश कार्तिक आणि रजत पाटीदार यांनी तुफान फलंदाजी केली आहे. रजतने शकतकी खेळी केली आहे. तर दिनेश कार्तिकनेदेखील मोठे फटकाे मारले आहेत. सध्या बंगळुरुच्या २०५ धावा झाल्या आहेत.
बंगळुरु संघाला महिपाल लॉमरोरच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. लॉमरोरने १४ धावा केल्या. सध्या बंगळुरु संघाच्या ११५ धावा झालेल्या आहेत.
बंगळुरु संघाला ग्लेन मॅक्सवेलच्या रुपात तिसरा झटका बसला आहे. मॅक्सवेलने ९ धावा केल्या. सध्या बंगळुरु संघाच्या ९२ धावा झाल्या आहेत.
बंगळुरु संघाचा फलंदाज रजत पाटीदार धमाकेदार फलंदाजी करत असून त्याने अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची खराब सुरुवात झाली आहे. बंगळुरुचे सध्या दोन गडी बाद झाले आहेत. तर सध्या बंगळुरुच्या ८४ धावा झाल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला दुसरा मोठा झटका बसला आहे. विराट कोहली २५ धावांवर असताना झेलबाद झाला आहे.
एलिमिनेटर्सच्या या सामन्यादम्यान पाऊस थांबला आहे. त्यामुळे नाणेफेक झाली असून लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकली असून लखनऊने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बंगळुरु संघ सुरुवातीला फलंदाजी करेल.
पावसाचा अडथळा असाच सुरु राहिला सामन्याचे काय होणार हे आयपीएलने सांगितले आहे.
?????????!
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022
Playing Conditions for the #TATAIPL 2022 Playoffs ?
*⃣ All Timings In IST pic.twitter.com/eelQXPHJ2b
पाऊस आल्यामुळे मैदानाला झाकण्यात आले आहे. अजूनही नाणेफेक झालेली नाही.
? Update from the Eden Gardens ?
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022
It has started to rain ?️ in Kolkata and the toss is delayed!
Follow the match ▶️ https://t.co/cOuFDWIUmk #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/W7dlpdeogK
एलिमिनेटर सामन्यावर पावसाचं सावट आलं आहे. ईडन गार्डन स्टेडियमच्या परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे मैदानाला झाकण्यात आलं आहे. पावसामुळे नाणेफेकीस उशीर झाला आहे.
IPL 2022 LSG vs RCB live