मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढत चांगलीच रोहमर्षक ठरली. शेवटच्या षटकापर्यंत लांबलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीवर पाच गडी राखून थरारक विजय मिळवला. तर या सामन्यातील पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान संपुष्टात आले असून बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. दिल्लीने मुंबईसमोर १६० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली. मुंबईला विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी टीम डेव्हिडने मोठी मेहनत घेतली. आजच्या सामन्याचा तोच हिरो ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरुच्या खेळाडूंनी हे काय केलं? MI vs DC सामन्यात मुंबईच्या विजयासाठी…

दिल्ली कॅपिटल्सलने विजयासाठी दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाला मोठी मेहनत घ्यावी लागली. मुंबई संघाकडून इशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला आले. मात्र रोहित शर्माने चांगलीच निराशा केली. रोहित फक्त दोन धावा करु शकला. इशान किशनने मात्र संघाला सावरले. त्याने तीन चौकार आणि चार षटकार लगावत ३५ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या.

हेही वाचा >>> पृथ्वी शॉ चांगलाच गोंधळला, जसप्रितच्या बाऊन्सरचा सामना करताना थेट खाली कोसळला; झाला झेलबाद

मुंबई इंडियन्सच्या ७६ धावा झालेल्या असताना इशान किशन बाद झाला. त्यानंतर मात्र संघ अडचणीत सापडला होता. मात्र देवाल्ड ब्रेविस (३७), तिलक वर्मा (२०), यांनी धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे सामना पुन्हा एकदा मुंबईच्या बाजूने झुकला.टीम डेव्हिडने तर मोठे फटके मारत दिल्लीच्या तोंडून विजयाचा खास हिसकावून घेतला. टीम डेव्हिडीने ११ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि चार षटकार लगावत ३४ धावा केल्या. टीम डेव्हिडीच्या या खेळीमुळेच मुंबईला विजयापर्यंत पोहोचता आले.

हेही वाचा >>> भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा; उमरान मलिक, दिनेश कार्तिक यांना संधी मिळण्याची शक्यता

याआधी मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला डेविड वॉर्नर स्वस्तात बाद झाला. त्याने अवघ्या पाच धावा केल्या. त्यानंतर २२ धावांवर मिचेल मार्शच्या रुपात दिल्लीचा दुसरा गडी बाद झाला. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही. त्याने २४ धावा केल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि रोवमन पॉवेल या जोडीने संघाला सावरलं. पंतने आपली भूमिका चोख बजावत ३३ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. तर रोवमन पॉवेलने ३४ चेंडूंमध्ये ४३ धावांची शानदार खेळी करत संघाला सावरलं. सरफराज खान (१०) अक्षर पटेल (१९) यांनी निराशाजनक खेळी केली. त्यामुळे वीस षटके संपेर्यंत दिल्ली संघ १५९ धावा करु शकला.

हेही वाचा >>> चेन्नईविरोधात खेळताना चहलने मोडला हरभजन सिंगचा विक्रम, केली ‘ही’ मोठी कामगिरी

गोलंदाजी विभागात मुंबईच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीला मोठे फटके मारू दिले नाहीत. परिमामी दिल्लीला फक्त १५९ धावा करता आल्या. बुमराहने पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रोवमन पॉवेल अशा तीन आघाडीच्या फलंदाजांना तंबुत पाठवलं. शार्दुल ठाकुरनेही दोन गडी बाद केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 mi vs dc mumbai indians won by five wickets defeated delhi capitals rcb goes to playoffs prd
First published on: 21-05-2022 at 23:56 IST