आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १२ वा सामना चांगलाच रंगतदार ठऱला. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरु असलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने हैदराबादसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, ही धावसंख्या उभारताना पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या केएल राहुलने या सामन्यात मात्र नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याने सर्वाधिक ६८ धावा करुन लखनऊला २६९ धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पंजाबने सामना जिंकला, पण मैदानात चेन्नईच्या धोनीची चर्चा, रचला ‘हा’ नवा विक्रम

लखनऊ सुपर जायंट्सने आतापर्यंत दोन सामने खेळले असून सध्या या संघाची तिसरी लढत हैदराबादसोबत सुरु आहे. लखनऊच्या पहिल्या सामन्यात संघाचा कर्णधार केएल राहुला शून्यावर बाद झाला होता. एकही धावसंख्या न करु शकल्यामुळे राहुलच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. मात्र याच राहुलने आता तिसऱ्या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याने कर्णधार म्हणून आपली जबाबदारी चोखपणे बजावली आहे. त्याने सलामीला येत ५० चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एक षटकार लगावत ६८ धावा केल्या आहेत. एकीकडे लखनऊचा बुरुज ढासळत असताना एकट्या राहुलने संघाला सांभाळलं. त्याने एकेल्या धावांमुळेच लखनऊला १६९ धावा करता आल्या.

हेही वाचा >>> आयपीएल सुरु असताना आकाश चोप्राने केली अजब मागणी, युजवेंद्र चहलने दिल्ला भन्नाट रिप्लाय, म्हणाला..

दरम्यान, लखनऊने वीस षटकांत सात गडी बाद १६९ धावा केल्या. ही धावसंख्या उभारताना केएल राहुलला दीपक हुडाने साथ दिली. दीपकने ३३ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. तीन षटकार आणि चौकार यांच्या मदतीने हुडाने ही धावसंख्या उभारली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 srh vs lsg lucknow super giants captain k l rahul played fabulously prd