Orange cap predication: क्रिकेटची सर्वात श्रीमंत लीग सुरू झाली आहे. ३१ मार्चपासून सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत आहे. पहिल्या सामन्यापासूनच फलंदाजांनी आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली. स्पर्धा सुरू होताच खेळाडूंमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपची लढाईही सुरू झाली आहे. दरम्यान, आयपीएलच्या या मोसमात हा खेळाडू ऑरेंज कॅप जिंकेल, असे एका माजी भारतीय क्रिकेटपटूने एका युवा खेळाडूला सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्गज सेहवागने केली मोठी भविष्यवाणी

आयपीएल सुरू होताच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. कोणता खेळाडू ‘ऑरेंज कॅप’ जिंकणार हे सेहवागने सांगितले आहे. यावेळी सेहवागने चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला आयपीएलची ऑरेंज कॅप जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना तो म्हणाला की, “ऋतुराज गायकवाड हा ऑरेंज कॅप जिंकण्याचा यावर्षी सर्वात मोठा दावेदार आहे.”

या विशेष यादीत माजी क्रिकेटपटूने ऋतुराज गायकवाडला प्रथम स्थान दिले आहे. गायकवाड याने २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकली आहे. यानंतर त्याने दुसऱ्या स्थानावर लखनऊचा कर्णधार केएल राहुलची निवड केली आहे. सेहवाग म्हणाला, “राहुलच्या उत्कृष्ट कामगिरीचा अंदाज यावरून लावता येतो की, गेल्या पाच हंगामात त्याने सलग ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. पण तो जिंकेलच असे नाही.”

हेही वाचा: PAK vs NZ: पाकिस्तान दौऱ्यापेक्षा न्यूझीलंड खेळाडूंचे IPLला प्राधान्य, माजी पाक खेळाडूंची भारतावर आगपाखड

पहिल्या सामन्यात शानदार खेळी खेळली

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज फलंदाजी केली. गुजरातविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने ९२ धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. मात्र या सामन्यात चेन्नई संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कळवू की IPL २०२१ मध्ये ऋतुराजने CSKला स्वबळावर खिताब दिला होता आणि ऑरेंज कॅप त्याच्या नावावर होती.

हे आणखी काही खेळाडू ऑरेंज कॅपची दावेदारी ठोकणार

सेहवाग पुढे म्हणाला की, “ऑरेंज कॅप जिंकण्याच्या बाबतीत शुबमन गिल माझ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सेहवागने काइल मेयर्स आणि भानुका राजपक्षे लाही स्थान दिले आहे. आयपीएल २०२३ मध्ये या दोन्ही खेळाडूंची बॅटने जबरदस्त धावा निघतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.” माहितीसाठी, कोहलीला २०१६ मध्ये ऑरेंज कॅप मिळाली होती.

हेही वाचा: IPL 2023: … प्रेक्षकांना इशारा… असे पोस्टर्स झळकावल्यास कडक कारवाई करणार! IPL गव्हर्निंग कौन्सिलची चाहत्यांना सक्त ताकीद

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील खेळाडू

ऋतुराज गायकवाड ९२

काइल मेयर्स ७३

शुबमन गिल ६३

डेव्हिड वॉर्नर ५६

भानुका राजपक्षे ५०

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 sehwag predicts before season ends not kl rahul kohli rohit but these four players to claim orange cap avw