Top 5 Oldest Player To Score A Century In IPL : रोहित शर्माने आयपीएलच्या १७व्या हंगामातील २९ व्या सामन्यात सीएसकेविरुद्ध शानदार शतक झळकावले. या सामन्यात त्याने ६३ चेंडूचा सामना करताना नाबाद १०५ धावा केल्या. रोहित शर्माने संघासाठी शतकी खेळी साकारली, पण मुंबईला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. २०१२ नंतर म्हणजेच १२ वर्षांनंतर हिटमॅनचे हे आयपीएलमधील दुसरे शतक होते. रोहितने वयाच्या ३५ वर्षे ३५० दिवसांत आयपीएलमधील दुसरे शतक झळकावले, परंतु या लीगमध्ये सर्वात वयस्कर शतक झळकावणारा फलंदाज हा हिटमॅन नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहितने वयाच्या ३६ व्या वर्षी झळकावले शतक –

रोहित शर्माने सीएसकेविरुद्ध ज्या पद्धतीने फलंदाजी केली, तो युवा फलंदाजांसाठी नक्कीच धडा होता. वयाच्या या टप्प्यावर रोहित शर्मा ज्या प्रकारे खेळत आहे ते प्रेरणादायी आहे. त्याने या लीगमध्ये वयाच्या ३६ वर्षे आणि ३५० दिवसात दुसरे शतक झळकावले. याबरोबरच आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर या लीगमध्ये सर्वात वयस्कर फलंदाज म्हणून शतक झळकावण्याच्या बाबतीत तो दुसरा भारतीय ठरला आहे. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात वयोवृद्ध भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आहे, ज्याने वयाच्या ३७ वर्षे ३५६ दिवसांत हा पराक्रम केला.

आयपीएलबद्दल बोलायचे तर, या लीगमध्ये शतक झळकावणारा सर्वात वयस्कर फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट होता, ज्याने वयाच्या ३९ वर्षे आणि १८४ दिवसांत हा पराक्रम केला होता. तसेच दुसरा क्रमांक सनथ जयसूर्याचा आहे, ज्याने वयाच्या ३८ वर्षे आणि ३१९ दिवसांत शतक झळकावले. तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे, ज्याने वयाच्या ३८ वर्षे २१० दिवसांत शतक झळकावले आहे.

हेही वाचा – MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू

या यादीत चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने वयाच्या ३७ वर्षे ३५६ दिवसांत या लीगमधील एकमेव शतक झळकावले आहे. आता या यादीत रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आला आहे. सीएसके विरुद्धच्या सामन्यात हिटमॅनने ६३ चेंडूत ५ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावा केल्या. त्याचबरोबर या लीगमधील ही त्याची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

आयपीएलमध्ये शतक झळकावणारे सर्वात वयस्कर खेळाडू –

३९ वर्षे १८४ दिवस – ॲडम गिलख्रिस्ट
३८ वर्षे ३१९ दिवस – सनथ जयसूर्या
३८ वर्षे २१० दिवस – ख्रिस गेल
३७ वर्षे ३५६ दिवस – सचिन तेंडुलकर
३६ वर्षे ३५० दिवस – रोहित शर्मा
३६ वर्षे ३४४ दिवस – शेन वॉटसन

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 rohit sharma hit 2nd century at age of 36 year and 350 days know who is oldest to score century in ipl vbm