Mohammed Siraj vs Phil Salt : मोहम्मद सिराज आणि फिल सॉल्ट यांच्यात भर मैदानात शाब्दिक चकमक झाली होती. सिराजच्या घेतलेल्या रागाच्या भूमिकेमुळं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. चाहत्यांनीही सिराजच्या अशा वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. आरसीबीच्या गोलंदाजांवर टीका टीप्पणीही केली जात आहे. अशातच आता सिराजने या वादविवादाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. एखादा फलंदाज जेव्हा गोलंदाजाला बोलतो, तेव्हा राग येतो. त्यावेळी मी अशाच प्रकारे रिअॅक्ट होतो, असं सिराजनं म्हटलं आहे.

आरसीबीकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत सिराजने म्हटलं की, “जेव्हा कुणी गोलंदाजाला बोलतो, तेव्हा राग तर येतोच पण फलंदाजाने जर चांगली फलंदाजी केली तर मैदानावर सन्मानही दिला जातो. म्हणून मी त्याला सामना संपल्यानंतर गळाभेट दिली होती.” आरसीबीचा पुढील सामना आज मुंबई इंडियन्सविरोधात होणार आहे. या सामना खूप रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांना कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. विजयी होणाऱ्या संघाला गुणतालिकेत फायदा होणार आहे. गुणतालिकेत बंगळुरू सहाव्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्स आठव्या स्थानावर आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात हा महामुकाबला होणार आहे.

नक्की वाचा – IPL मध्ये ‘The Hitman’पासून ‘फ्लॉपमॅन’ कसा झाला रोहित शर्मा? वीरेंद्र सेहवागने सांगितलं यामागचं खरं कारण, म्हणाला…

आरसीबीची संभाव्य प्लेईंग ११ : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई/अनुज रावत, केदार जाधव, दिनेश कार्तिक, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग ११ : ईशान किशन, कॅमरन ग्रीन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, अरशद खान