२०१९च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर धोनीने दीर्घ विश्रांती घेतली. मधल्या काळात काही वेळा धोनीला पुनरागमनाची संधी होती. पण काही वेळा धोनीने संधी नाकारली तर काही वेळा संघ व्यवस्थापनाने त्याला नकार कळवला. त्यातच IPL आणि नंतर T20WorldCup पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय यामुळे धोनी अखेर १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण IPLमध्ये तो खेळत राहणार असल्याने चाहत्यांना हायसं वाटलं. त्यानुसार आता तब्बल ४३६ दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर धोनी अखेर आज मैदानावर उतरताना दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेंद्रसिंग धोनी संध्याकाळी ७ वाजता टॉससाठी मैदानात येणार असला तरी ट्विटरवर मात्र सकाळपासूनच धोनीची चर्चा रंगली होती. धोनी जगभरातील चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत असल्याने ट्विटरवर #WelcomeBackDhoni हा हॅशटॅग ट्रेंड झाला. आपल्या लाडक्या धोनीला पुन्हा खेळताना बघण्याबद्दल काय भावना आहेत, त्या साऱ्या चाहत्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या. पाहूया त्यापैकी काही निवडक ट्विट-

कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाविरोधात धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबई संघातील लसिथ मलिंगाची अनुपस्थिती तर चेन्नईच्या संघातील सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांची माघार यामुळे दोन्ही संघांच्या खेळाकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या विजेत्या संघात असलेले कायरन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्होदेखील एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये १७-११ असे मुंबईचे पारडे जड आहे. पण क्रिकेटमध्ये काहीही सांगणं कठीण असतं त्यामुळे आज होणाऱ्या मूळ सामन्याकडेच साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni shines on twitter as welcomebackdhoni hashtag trends msd comeback ipl 2020 mi vs csk vjb