Avesh Khan Interview Naveen Ul Haq: १ मे रोजी आरसीबी आणि एलएसजी संघात सामना झाला होता. या सामन्यात नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात वादावादी झाली होती. या सामन्यांतर पुन्हा विराट कोहली आणि एलएसजी संघाचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. ज्यामुळे तीन-चार दिवस घटनेची चर्चा होती. त्यानंतर विराट कोहली आणि नवीन-उल-हकने इन्स्टाग्रामवरुन एकमेकांवर नाव न घेता निशाणा साधला होता आता या घटनेनंतर प्रथमच नवीन उल हकची मुलाखत समोर आली आहे.

अफगाणिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाची ही मुलाखत लखनऊचा गोलंदाज आवेश खानने घेतली आहे. फ्रँचायझीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नवीन आणि आवेश दोघेही एक एक चिठ्ठी उचलतात आणि त्यात लिहिलेले प्रश्न एकमेकांना विचारतात. दरम्यान, अनेक गोष्टी समोर येतात. विराटशी झालेल्या वादानंतर या व्हिडिओतील नवीनच्या उत्तरांवर नक्कीच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. स्लेजिंगशी संबंधित एक प्रश्नही होता, ज्याचे उत्तर नवीनने दिले. त्याचवेळी गौतम गंभीरने त्याला पाठिंबा दिल्याची कबुलीही त्याने दिली.

नवीनने मजेशीर उत्तरे दिली –

या व्हिडिओमध्ये आवेश खान एका क्षणी नवीनला विचारतो की त्याला त्याच्या कारकिर्दीतील स्लेजिंगशी संबंधित कोणतीही घटना सांगायची आहे का? यावर नवीनने सर्वप्रथम सांगितले की, मी स्लेजिंग सुरू करत नाही, ही माझी सवय नाही. एका प्रथम श्रेणी सामन्यात मी नॉन स्ट्राईकवर उभा होतो आणि जो फलंदाजी करत होता. तो स्लेजिंग करत होता. हे ऐकून आवेशने त्याला गंमतीने विचारले की अलीकडच्या काळात अशी काही घटना घडली आहे का? ज्यावर दोघेही हसताना दिसले आणि पुढच्या प्रश्नाकडे वळले. याशिवाय नवीन उल हकने सांगितले की गौतम गंभीरने त्याला आयपीएल पदार्पणापूर्वी साथ दिली होती.

गंभीरने नवीनला साथ दिली –

जेव्हा नवीनला विचारण्यात आले की आयपीएल पदार्पणात तुला कसे वाटले, तेव्हा तो म्हणाला की गौतम गंभीरने त्याला खूप साथ दिली आणि खास सल्लाही दिला. यापेक्षा वेगळे काही करण्याची गरज नसल्याचे गंभीरने त्याला सांगितले. आत्तापर्यंत जे करत आलात तेच कर. यानंतर, आवेश खान यावर खिल्ली उडवताना दिसला आणि हावभावात (विराट आणि नवीनची मैदानावरची झुंज) हावभाव करताना तो म्हणाला की हो, जीजी (गौतम गंभीर) ने तुला खूप पाठिंबा दिला. यावर नवीन हसताना दिसला. त्याच वेळी, यानंतर एक व्हिडिओ मीम देखील प्ले होतो, जो खूपच मजेदार होता.