Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Qualifier 1 Playing 11: आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ चा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मुल्लानपूरमध्ये रंगणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येतील. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कारण काही खेळाडू मायदेशी परतले आहेत. तर काही खेळाडू दुखापतीतून सावरल्यानंतर कमबॅक करतील. पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण मार्को यान्सेन मायदेशी परतला आहे. तर आनंदाची बातमी अशी की, फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल फिट झाला असून तो कमबॅक करणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी देखील आनंदाची बातमी समोर येत आहे, वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड या सामन्यात कमबॅक करणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते पंजाब किंग्ज संघाची प्लेइंग ११:

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक/युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग</p>

अशी असू शकते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची प्लेइंग ११:

विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, मयंक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा/जोश हेजलवुड, सुयश शर्मा

असे आहेत दोन्ही संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा, सुयश शर्मा, जोश हेजलवूड, टिम सेफर्ट, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, स्वप्नील सिंग, ब्लेसिंग मुजरबानी, टिम डेव्हिड, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग

पंजाब किंग्ज संघ: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, युजवेंद्र चहल, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, झेवियर बार्टलेट, प्रवीण दुबे, अजमतुल्ला ओमरझाई, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, कुलदीप सेन, मिचेल ओवेन, हरनूर सिंग, पायला अविनाश.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: