पुणे वॉरियर्सला चीतपट करत घरच्या मैदानावरील विजयी परंपरेसह गड राखण्याचे राजस्थान रॉयल्सचे मनसुबे आहेत. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पराभव झाल्याने बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी राजस्थानला संघर्ष करावा लागणार आहे. वॉरियर्सविरुद्धच्या आधीच्या लढतीत पुण्याने राजस्थानवर सहज मात केली होती. त्यामुळे राजस्थानला विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.
शेन वॉटसन आमि संजू सॅमसन यांच्यावर राजस्थानच्या फलंदाजाची भिस्त आहे. ब्रॅड हॉग, स्टुअर्ट बिन्नी आणि दिशांत याज्ञिकने उपयुक्त खेळी करत योगदान दिले आहे. मात्र सलामीवीर अजिंक्य रहाणेकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत जेम्स फॉल्कनरला सिद्धार्थ त्रिवेदी आणि वॉटसन यांची साथ आहे. अजित चंडिलाची फिरकीही पुण्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.
वॉरियर्ससाठी रॉबिन उथप्पा हुकमी एक्का ठरू शकतो. धडाकेबाज फलंदाज आरोन फिन्चकडून सातत्यपूर्ण खेळाची अपेक्षा आहे. स्टीव्हन स्मिथ लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि राहुल शर्माला अन्य गोलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे. गुणतालिकेत तळाशी असणारा पुणे संघ आता उत्तरार्धात सन्मान राखण्यासाठी राजस्थानला धक्का देऊ शकतो.
* सामना : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स
* स्थळ : सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
* वेळ : रात्री ८ वा.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2013 रोजी प्रकाशित
राजस्थान गड राखणार?
पुणे वॉरियर्सला चीतपट करत घरच्या मैदानावरील विजयी परंपरेसह गड राखण्याचे राजस्थान रॉयल्सचे मनसुबे आहेत. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पराभव झाल्याने बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी राजस्थानला संघर्ष करावा लागणार आहे.
First published on: 05-05-2013 at 01:24 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals will fight with pune warriors