IPL 2025 Royal Challengers Bengaluru Full Squad and Schedule: आयपीएलमधील सर्वच फ्रँचायझींचा मोठा चाहता वर्ग आहे. पण आरसीबी संघाने गेल्या १८ वर्षात एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नसतानाही चाहत्यांनी आरसीबीला प्रचंड पाठिंबा दर्शवला आहे. चाहते यंदा तरी संघाला ट्रॉफीपर्यंत पोहोचता येईल अशी आशा ठेवून असतात. पण संघाने यंदाही आयपीएल लिलावात संघ निवड करताना चाहत्यांना निराश केल्याचे चाहत्यांनी लिलावानंतर ट्रोल करत म्हटले. आयपीएल २०२५ साठी आरसीबीचा संघ कसा असणार आहे, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या लिलावातील डावपेचांवर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार ट्रोलिंग केलं. सोशल मीडियावर असंख्य मीम्स फिरत होते. बंगळुरू संघाने ऋषभ पंत, के.एल.राहुल आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंसाठी प्रयत्न केले पण त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे आगामी हंगामात त्यांचा कर्णधार कोण होणार हा प्रश्न कायम होता. पण अखेरीस संघाने रजत पाटीदारच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली. विराट कोहलीकडे पुन्हा संघाचं कर्णधारपद जाईल अशी चर्चा होती, पण संघाने नव्या युवा खेळाडूवर विश्वास दर्शवला.

बंगळुरूने मोहम्मद सिराजसाठी राईट टू मॅचचा अधिकार वापरला नाही. मोहम्मद सिराज संघाचा एक महत्त्वाचा वेगवान गोलंदाज होता, पण संघाने त्याला ना रिटेन केलं ना पुन्हा लिलावात संघात सामील केलं. विकेटकीपर, फलंदाज, नेतृत्व सगळं करू शकणाऱ्या राहुलसाठी जोरदार बोली लावली नाही. लिलावात त्यांनी फिल सॉल्ट, लायम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना घेतलं. रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांच्यासाठी पैसा मोजला.

आरसीबीच्या संघात कोणकोणते खेळाडू?

मागील हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसने संघाचं नेतृत्व सांभाळलं होतं. त्याचा फिटनेस उत्तम आहे. फॉर्मही चांगला आहे मात्र तो चाळिशीत आला आहे. तो आणखी किती वर्ष आयपीएलसारखी दोन महिने चालणारी स्पर्धा खेळू शकतो याबाबत साशंकता आहे. त्यामुळे संघाने भविष्याचा विचार करता फाफ डू प्लेसिसला रिलीज केलं. तसेच विराट कोहलीसह दोन युवा खेळाडू रजत पाटीदार आणि यश दयाल यांनी रिटेन केलं आहे. बंगळुरू संघाने अष्टपैलू खेळाडू लायम लिव्हिंगस्टोनला ८.७५ कोटी रुपये मोजून संघात समाविष्ट केलं. बंगळुरूने धडाकेबाज फलंदाज फिल सॉल्टला ११.५० कोटी रुपयांची बोली लावून संघात समाविष्ट केलं.

आरसीबीने विराट कोहलीला २१ कोटी रुपयांना रिटेन केलं. यानंतर टीमने रजत पाटीदारला ११ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यश दयाल यालाही संघाने ५ कोटींना संघात कायम ठेवलं. याशिवाय संघाने कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, टीम डेव्हिड, देवदत्त पड्डिकल यांना लिलावात संघात घेतलं.

आरसीबीच्या ताफ्यातील रिटेन केलेले खेळाडू आणि किंमती

विराट कोहली- २१ कोटी
रजत पाटीदार – ११ कोटी
यश दयाल – ४ कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ (Royal Challengers Bengaluru IPL 2025 Full Squad)

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, नुवान तुषारा, जेकब बॅथेल, मनोज भंडागे, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक चिकारा,लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड

हेही वाचा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Royal Challengers Bengaluru Match Schedule)

२२ मार्च – कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२८ मार्च – चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. गुजरात टायटन्स
७ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१० एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स
१३ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१८ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स
२० एप्रिल – पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२४ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स
२७ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
३ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स
९ मे – लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१३ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद
१७ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb ipl 2025 full squad royal challengers bengaluru schedule fixtures match list dates timings venues bdg