Role Of Operation Sindoor In RCB Winning IPL 2025: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जवर ६ धावांची विजय मिळवला. या विजयासह बंगळुरूची आयपीएल जिंकण्याची १८ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आहे. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी कबूल केले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ९ मे रोजी आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित होणे त्यांच्यासाठी वरदान ठरले.

आयपीएल स्थगित झाली त्या कालावधीत बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार बोटाच्या दुखापतीतून बरा झाला, तर संघाचा आघाडीचा गोलंदजा गोलंदाज जोश हेझलवूडलाही खांद्याच्या दुखापतीतून सावरता आले.

ब्रेकमुळे हेझलवुडला आणि रजतला…

आयपीएलचा अंतिम सामना जिंकल्यानंतर बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर म्हणाले की, “विजयानंतर आम्ही आनंद साजरा करत असतानाही, काही खेळाडूंनी मला सांगितले की, ब्रेकमुळे हेझलवुडला आणि रजतला त्याच्या बोटाच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी वेळ मिळाला. असे असले तरी आम्हाला टिम डेव्हिड आणि देवदत्त पडिकल यांची उणीव भासली. ते आमच्या संघाचा महत्त्वाचा भाग होते.”

बंगळुरूच्या विजयापेक्षा त्या गोष्टी महत्त्वाच्या…

अँडी फ्लॉवर पुढे म्हणाले की, “त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ट्रॉफी जिंकण्यापेक्षा निश्चितच मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी घडत होत्या. आम्हा सर्वांना त्या गोष्टींची कल्पना होती. पण हो, त्यामुळे आम्हाला थोडा श्वास घेण्यास जागा मिळाली. त्याआधी आम्ही थोडे मंद होतो.”

कृणाल पंड्या सामनावीर

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले. चौथ्यांदा अंतिम सामना खेळणाऱ्या बंगळुरूने हे पहिले विजेतेपद आहे. दरम्यान १७ धावांत २ बळी घेणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

पंजाबच्या शशांक सिंहची एकाकी झुंज

प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने कोहलीच्या ४३ धावांच्या संथ खेळीच्या जोरावर २० षटकांत ९ गडी बाद १९० धावा केल्या. पंजाबकडून जेमिसन आणि अर्शदीप सिंग यांनी ३-३ विकेट्स घेतल्या.

आरसीबीच्या या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकांत ७ गडी बाद १८४ धावा करता आल्या. पंजाबकडून शशांक सिंहने ६१ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली.