Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore Score Updates : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात ईडन गार्डनमध्ये होत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत कोलकाताची दाणादाण उडवली होती. परंतु, रहमनुल्लाह गुरबाज आणि शार्दुल ठाकूरच्या वादळी खेळीमुळं कोलकाताची धावसंख्या दोनशे पार गेली. पाच फलंदाज बाद झाल्यानंतर शार्दूल आणि रिंकू सिंगवर कोलकाता संघाची कमान होती. आंद्रे रसेल बाद होताच कोलताला मोठा धक्का बसला होता. पण मराठमोळ्या शार्दुल ठाकूरने अवघ्या २० चेंडूत आयपीएलमधील पहिलं अर्धशतक ठोकून ईडन गार्डनमध्ये इतिहास रचला. शार्दुलने २९ चेंडूत ३ षटाकर आणि ९ चौकार ठोकत ६८ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यामुळे कोलकाताने २० षटकांत ७ विकेट्स, गमावत २०४ धावांपर्यंत मजल मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिंकू सिंगने चौफेर फटकेबाजी करत वादळी खेळी केली. रिंकू सिंगने ३३ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. तर शार्दुलने आरसीबीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २९ चेंडूत ६८ धावांची धडाकेबाज खेळी करत आयपीएलमधील पहिलं अर्धशतक ठोकलं. त्यामुळे कोलकाताने २० षटकांत ७ बाद २०४ धावा केल्या. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी २०५ धावांची मजल मरावी लागणार आहे. गुरबाजने ४४ चेंडूत ५७ धावांची खेळी केली पण रसेल शून्यावर बाद होऊन माघारी परतला. परंतु, शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंगने सावध खेळी करत आरसीबीच्या गोलंदांजांचा समाचार घेतला आणि धावसंख्येचा आलेख चढता ठेवला.

आरसीबीसाठी डेविड विलीने दोन विकेट घेतल्या. तसंच कर्ण शर्मालाही दोन विकेट्स घेण्यात यश आलं. तर ब्रेसवेलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. गुरुबाजने ३ षटकार आणि ६ चौकार ठोकून ४४ चेंडूत ५७ धावा कुटल्या. डेविड विलीने भेदक मारा करत केकेआरच्या दोन फलंदाजांचा त्रिफळा उडवला. विलीने अय्यरला अवघ्या तीन धावांवर बाद केलं, तर मनदीप सिंगला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर आरसीबीचा गोलंदाज ब्रेसवेलने कर्णधार नितीश राणाला एका धावेवर असताना बाद केलं. त्यानंतर कर्ण शर्माने अप्रतिम गोलंदाजी करत एकाच षटकात गुरुबाज आणि आंद्रे रसलला बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shardul thakur historic inning against rcb at eden garden shardul thakur hits 50 runs in 20 balls 1st fifty in ipl nss