Suyash Sharma Interview: आयपीएल २०२३चा ५६ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. ज्यामध्ये राजस्थानने ९ विकेट्स राखून शानदार विजय नोंदवला. या सामन्यात केकेआरचा गोलंदाज सुयश शर्माने चांगली गोलंदाजी केली, पण त्याला एकही बळी घेता आला नाही. सुयशच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन प्रीमियर लीगने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सुयश म्हणाला, “गेल्या वर्षी जेव्हा मी अंडर १९ साठी ट्रायल दिली होती, तेव्हा माझी निवड झाली नाही. मी खूप चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर रात्री १२:३० ते १ च्या दरम्यान यादी आली. मी झोपलो होतो. मी उठलो आणि बऱ्याच वेळा यादी पाहिली, तरी त्यामध्ये माझे नाव नव्हते. त्यानंतर मी पहाटे ३ ते ६ वाजेपर्यंत मी रडलो होतो.”

सुयश शर्मा पुढे म्हणाला, ”माझा काय दोष या विचाराने मी खूप चिंतेत होतो. मी चांगली कामगिरी करत असताना, तरीही माझ्यासोबत हे का घडत आहे. मी खूप नाराज झालो होतो आणि सलूनमध्ये जाऊन टक्कल केली. त्यानंतर मी विचार केला होता की मी माझे कौशल्य सुधारेन ज्यामुळे मला घरी घेऊन जातील. माझे केसही वाढत होते आणि मी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत होतो. म्हणूनच मी माझे केस लांब ठेवायला सुरुवात केली.”

हेही वाचा – VIDEO: यशस्वी जैस्वालसाठी संजूने सॅमसनने केला अर्धशतकाचा त्याग; शतक हुकल्यानंतरही दिलदारपणा दाखवत मारली मिठी

सुयश शर्माने यावर्षी आयपीएलमध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकूण १० विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ३५ आहे. त्याने आरसीबीविरुद्ध ४ षटकात ३० धावा देऊन ३ बळी घेतले.

हेही वाचा – Rajasthan Royals: युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक कामगिरीनिमित्त राजस्थानच्या ड्रेसिंग रूममध्ये खास सन्मान, पाहा VIDEO

सामन्याबद्दल बोलायचे, तर ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ९ गडी राखून पराभव केला. सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या वेगवान फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने १४ षटकं संपण्यापूर्वी सामना जिंकला. या सामन्यात यशस्वीने केवळ १३ चेंडूत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकच नोंदवले नाही तर आयपीएल २०२३ च्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही तो दुसरा आला आहे. तो बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या एका धावेने मागे आहे. यशस्वीने आयपीएल २०२३ च्या १२ सामन्यांमध्ये १६७.१५ च्या स्ट्राइक रेटने ५७५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talking about his struggle days suyash sharma said i was very worried about what was wrong with me vbm