Aly Goni Tweet On Naveen Ul Haq Goes Viral : मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज टीम डेव्हिडने १९ व्या षटकात नवीन उल हकच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी केली. डेव्हिडने चौकार षटकारांचा पाऊस पाडून या षटकात १९ धावा कुटल्या. मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात नवीनने ४ षटकात ३७ धावा दिल्या. नवीनच्या गोलंदाजीवर मुंबईच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. मुंबई इंडियन्सचा या सामन्यात पाच धावांनी पराभव झाला. शेवटच्या षटकात मोहसिन खानने अप्रतिम गोलंदाजी करून लखनऊला विजय मिळवून दिला. त्यानंतर टीव्ही अभिनेता अली गोनीने एक ट्वीट करून क्रीडाविश्वात खळबळ उडवून दिली. गोनीनं केलेलं ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं असून कोहलीचे चाहत्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोनीने ट्वीट करत म्हटलं, ‘मोहसिनने शेवटचं षटक जबरदस्त फेकलं. नवीन भावा तू फक्त आंबा खा…’ अभिनेता अली गोनीचा हा ट्वीट इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहते या ट्वीटवर मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी नवीन उल हकने आंबा खात असल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ज्यामुळे नवीनची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. याशिवाय कोहली आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या वादविवादाचीही आयपीएलमध्ये खूप चर्चा रंगली.

नक्की वाचा – मुंबई हरली पण रोहित शर्मानं चाहत्यांची मनं जिंकली, कोहलीशी भिडणाऱ्या नवीन उल हकची केली धुलाई, षटकाराचा Video होतोय व्हायरल

माझं करिअर संपण्याच्या मार्गावर होतं, मोहसिन म्हणाला…

गतवर्षी मोहसिन खानच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या डाव्या खांद्यावर रक्ताच्या गुठल्या जमा झाल्या होत्या. या शस्त्रक्रीयेमुळं मोहसिन घरेलू आणि आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. मोहसिनने सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं, “एक वेळ अशी होती, जेव्हा मी क्रिकेट खेळणं सोडणार होतो. माझ्या आजारपणामुळं मला असा निर्णय घेण्याची वेळ आली होती. मला त्यावेळी झालेल्या गोष्टींबद्दल आठवण आल्यावर खूप भिती वाटते. कारण डॉक्टर म्हणाला होता, जर मी एक महिन्यानंतर शस्त्रकीया केली असती, तर माझे हातही कापावे लागले असते.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actor aly goni tweet on naveen ul haq went viral on social media virat kohli fans gives funny reaction mi vs lsg nss