KKR vs RCB Match Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीने रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान पंचांशी वाद घातला. काहीच वेळात हा व्हिडीओ ऑनलाईन तुफान व्हायरल झाला होता. एकीकडे विराट कोहलीचं संतप्त रूप व्हायरल होत असताना त्याच डावात नंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर सुद्धा डगआउटजवळ फोर्थ अंपायरशी वाद घालताना दिसला. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित देखील या चर्चेत सामील झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधी विराट, मग श्रेयस आणि मग गंभीर पंचांना भिडला, पाहा Video

आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना १८ व्या षटकाच्या सुरुवातीला हा प्रकार घडला. शेवटच्या दोन षटकांत दिनेश कार्तिक स्ट्राइकवर असताना संघाला ३१ धावा हव्या होत्या. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात पंचांशी चर्चा करताना केकेआर डगआउटकडे हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पंच कुठल्यातरी गोष्टीला परवानगी देत नसल्याचे श्रेयस सांगताना दिसत होता.

इतक्यात, गंभीर सीमारेषेजवळ फोर्थ अंपायरशी जोरदार वाद घालताना दिसत होता. सुरुवातीला, कुणालाच ही चर्चा काय आहे हे समजू शकले नाही, परंतु नंतर हे लक्षात आलं की, केकेआरला अंतिम दोन षटकांसाठी सुनील नरेन मैदानाबाहेर हवा होता आणि त्याजागी रहमानउल्ला गुरबाजला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून खेळायला पाठवायचं होतं. नरेनने चार षटकांचा कोटा पूर्ण केल्यावर, आरसीबीची आक्रमक बाजू पाहता केकेआरला शेवटच्या दोन षटकांसाठी सक्षम क्षेत्ररक्षक हवा होता.

हे ही वाचा<< रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”

केकेआर विरुद्ध आरसीबी मॅच हायलाईट्स (KKR vs RCB Match Highlights)

दिनेश कार्तिकने संघाची बाजू उचलून धरत ३१ धावांचा पाठलाग करताना १८ चेंडूंमध्ये २५ धावा कमावल्या होत्या. पण अंतिम षटकाच्या आधी दिनेश बाद झाल्याने पुन्हा आरसीबीसमोर २१ धावांचे आव्हान उभे ठाकले. स्ट्राइकवर करण शर्मा आणि मोहम्मद सिराज असताना, शर्माने मिचेल स्टार्कच्या चेंडूवर तीन षटकार ठोकून दोन चेंडूत तीन धावांचे अंतर कमी केले. मिचेल स्टार्कने तितक्यात करणची विकेट घेतली आणि आरसीबीची परिस्थिती अजून बिकट झाली. शेवटच्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसन धावबाद झाला आणि आरसीबीचा संघ २० षटकांत २२२ धावा करून सर्वबाद झाला. अवघ्या एका धावेच्या फरकाने केकेआरने आरसीबीवर रोमहर्षक विजय मिळवला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video virat kohli fight why gautam gambhir fiercely argue with umpire during rcb vs kkr shreyas iyer complaints ipl point table today svs
First published on: 22-04-2024 at 09:56 IST