रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडला आहे. रविवारी झालेल्या दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध बंगळुरू सामन्यावेळी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची भेट घेतल्यामुळे विराट अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या आचारसंहितेच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूने सामन्या दरम्यान संघातील सहकाऱ्यांशिवाय इतर कोणाशीही बोलायचे नसते.
फोटो गॅलरी- अनुष्काचे ‘विराट’प्रेम
दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात अनुष्का शर्मा प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. पावसाच्या आगमनामुळे सामना थांबविण्यात आला होता. दरम्यान, विराटने अनुष्काजवळ जाऊन भेट घेतली आणि जवळपास पाच मिनिटे दोघे गप्पांमध्ये रंगले होते. यावेळी दिल्लीचा दिग्गज खेळाडू युवराजही तिथे उपस्थित होता.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2015 रोजी प्रकाशित
अनुष्का भेटीमुळे विराट वादाच्या भोवऱयात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडला आहे. रविवारी झालेल्या दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध बंगळुरू सामन्यावेळी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची भेट घेतल्यामुळे विराट अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

First published on: 18-05-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli flouts rules again after being seen with anushka sharma