Virat Kohli’s chance to complete 7000 runs in IPL: आयपीएल २०२३ मधील ४३ वा सामना आज (१मे) लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात लखनऊचा संघ आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्याचबरोबर केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विजयाच्या ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करताना दिसेल.तसेट विराट कोहलीसाठी हा सामना खास आहे. कारण सामन्यात तो एक खास विक्रम करू शकतो. यासाठी विराटला फक्त ४३ धावा करण्याची गरज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट मोठ्या विक्रमापासून ४३ धावा दूर –

लखनऊविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ४३ धावा केल्या, तर तो एक खास विक्रम करेल. आयपीएलमध्ये ७००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी विराटला ४३ धावांची गरज आहे. विराटने या लीगमध्ये आतापर्यंत ६९५७ धावा केल्या आहेत. विराटने ४३ धावा केल्या तर आयपीएलच्या इतिहासात ७ हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरेल. असं असलं तरी आयपीएलमध्ये विराटच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अबाधित आहे. विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ शतके आणि ४९ अर्धशतके झळकावली आहेत.

सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांमध्ये विराटचा समावेश –

आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. १६व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. किंग कोहलीने आयपीएल २०२३ मधील ८ सामन्यांत ३३३ धावा केल्या आहेत. दरम्यान, नाबाद ८२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलच्या या मोसमात विराटने ५ अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने ३३ चौकार आणि ११ षटकार मारले आहेत. त्याच्या या चमकदार कामगिरीवरून तो जबरदस्त फॉर्मात असल्याचे दिसून येते.

हेही वााचा – Ashish Nehra’s son Arush: नेहराजींच्या मुलाने केली वडिलांची नक्कल; मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

प्लेऑफच्या दृष्टीने आरसीबीसाठी विजय आवश्यक आहे –

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विजय आवश्यक आहे. आयपीएल २०२३ मध्ये, आरसीबीने ८ सामने खेळले आहेत, ज्यापैकी ४ जिंकले आहेत आणि ४ हरले आहेत. फाफ डू प्लेसिसचा संघ ८ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli needs only 43 runs to complete 7000 runs in ipl tournament vbm