Delhi Capitals vs Rajasthan Royals Highlights: आयपीएल २०२४ चा ५६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जात आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने मोठी कामगिरी आपल्या नावे केली. युजवेंद्र चहलने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला बाद करत एक विकेट मिळवली. पण या विकेटसह चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युजवेंद्र चहल हा टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ३५० विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलाआहे. भारतासाठी ही मोठी कामगिरी आजपर्यंत कोणताही खेळाडू करू शकलेला नाही. भारतीय गोलंदाज म्हणून चहलने मोठा पराक्रम आपल्या नावे केला आहे. भारताकडून T20 मध्ये सर्वाधिक ३५० विकेट घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर झाला आहे.

चहलनंतर पियुष चावला या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ३१० विकेट्स आहेत. यानंतर रविचंद्रन अश्विन ३१० विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमार २९७ विकेट्ससह चौथ्या आणि अमित मिश्रा २८५ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.

भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज


युझवेंद्र चहल – ३५० विकेट्स
पियुष चावला – ३१० विकेट्स
रविचंद्रन अश्विन- ३०६ विकेट्स
भुवनेश्वर कुमार- २९७ विकेट्स
अमित मिश्रा- २८५ विकेट्स

दिल्ली कॅपिटल्स वि राजस्थान रॉयल्स मॅच अपडेट्स

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने तुफानी फटकेबाजी करत २० षटकांत ८ गडी गमावून २२१ धावा केल्या. जॅक फ्रेझर मॅकगर्कने २० चेंडूत ५० धावा करत दिल्लीला शानदार सुरुवात करून दिली. अभिषेक पोरेलने ६५ धावांची चांगली खेळी केली. यानंतर, अखेरच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सने २०५ च्या स्ट्राइक रेटने ४१ धावा केल्या. आरआरसाठी रविचंद्रन अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत २४ धावा देत ३ विकेट घेतले. याशिवाय ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल यांनाही १ विकेट मिळाली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal becomes the 1st indian bowler to take 350 wickets in t20 cricket dc vs rr ipl 2024 bdg