२०२० वर्षात भारतीय संघ आपली पहिली मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी पासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झालेली असून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहने पुनरागमन केलंय.
गेले काही महिने बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. दरम्यानच्या काळात उपचार घेतल्यानंतर, बुमराहने जोरदार सराव करत संघात स्थान मिळवलं आहे. पहिल्या टी-२० सामन्याआधी सरावादरम्यान, बुमराहने आपलं ठेवणीतलं अस्त्र वापरत (यॉर्कर चेंडूने) स्टम्प उडवला. बीसीसीआयने बुमराहच्या या सरावाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन