Jay Shah Net Worth and Family: बीसीसीआय सचिव जय शाह यांची बिनविरोध आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी जय शाह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. जय शाह येत्या १ डिसेंबर २०२४ पासून पदभार स्वीकारणार आहेत. पण जय शाह यांची संपत्ती नेमकी किती आहे आणि त्यांच्या कटुंबाबद्दल काही माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शाह आता आयसीसीचा अध्यक्ष झाले आहेत. २०१९मध्ये जय शाह यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झाली. बीसीसीआयच्या सचिवपदासह त्यांना २०२१ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. BCCI मध्ये प्रथमच जय शाह २०१५ मध्ये वित्त आणि विपणन समितीचे सदस्य बनले. यानंतर, ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्यांनी बीसीसीआयचे सर्वात तरुण सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी या अध्यक्षांसोबत काम केले आहे.

हेही वाचा – Jay Shah: ऑलिम्पिक २०२८, कसोटी क्रिकेट अन् बजेट… जय शाह यांच्या ICC अध्यक्षपदाचा कार्यकाळ जागतिक क्रिकेटसाठी का महत्त्वाचा असणार?

Jay Shah Net Worth: १०० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत जय शाह

जय शाह यांचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ रोजी झाला. त्यांचे वडील अमित शहा हे भाजपचे प्रसिद्ध नेते आहेत. जय शाह यांनी गुजरातमधून शिक्षण पूर्ण केले आणि बारावीनंतर निरमा विद्यापीठातून बी.टेक.ची पदवी मिळवली. जय शाह यांची एकूण संपत्ती १२४ कोटी रुपये आहे. त्यांच्या बिजनेसमधून जय शाह ही कमाई करतात. जय शाहांनी त्यांच्या कॉलेजमधील मैत्रिणीशी लग्न केले. ऋषिता पटेल असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. ऋषिताच्या वडिलांचे नाव गुणवंतभाई पटेल असून ते व्यापारी आहेत. जय शाह यांनी १० फेब्रुवारी २०१५ रोजी ऋषिता यांच्याशी विवाह केला. आता त्यांना दोन मुलीही आहेत.

हेही वाचा – Jay Shah ICC Chairman: जय शाह यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, जागतिक क्रिकेटमध्ये आता भारताचा दबदबा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह यांनी टेंपल एंटरप्राइजमध्ये डायरेक्टर पदही भूषवले आहे. कुसुम फिनसर्व्हमध्ये त्यांची सुमारे ६० टक्के भागीदारी आहे. जय शाह यांचा बीसीसीआयमध्ये प्रवेश २०१५ मध्ये झाला जेव्हा ते वित्त आणि विपणन समितीचे सदस्य झाले. बीसीसीआयमध्ये रुजू होताच त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनमधील पद सोडले. २०१९ मध्ये ते बीसीसीआयचे सचिव झाले. २०२२ मध्ये त्यांची पुन्हा बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jay shah net worth is 124 crore via business read here everything about his education and personal life in marathi bdg