Deepika Padukone Called Lakshya Sen After Paris Olympics Match: भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये उथ्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. भलेही लक्ष्यने पदक जिंकले नाही पण त्याची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी वाखणण्याजोगी होती. लक्ष्य सेनने बॅडमिंटन पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात पोहोचला, पण त्या सामन्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर तो कांस्यपदकाचा सामना खेळला पण त्यातही पहिला सेट जिंकल्यानंतर त्याच्या हाताच्या जखमेमुळे तो पुढील दोन सेट गमावत तो सामना गमावल्याने लक्ष्य चौथ्या स्थानी राहिला. या पराभवानंतर लक्ष्यला दीपिका पदुकोणने कॉल केला होता, याबद्दल त्याने स्वत: सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Ravindra Jadeja Wife: रवींद्र जडेजाची आमदार पत्नी कंबरेभर पाण्यात उतरून करतेय लोकांची मदत, जडेजाच्या कमेंटनेही वेधलं लक्ष, पाहा VIDEO

लक्ष्य सेनने ऑलिम्पिक २०२४ मधील कांस्यपदकाचा सामना गमावला. या सामन्यानंतर लक्ष्यचे प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांनी स्पष्ट भाषेत नाराजी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या ह्युमनज ऑफ बॉम्बेमध्ये झालेल्या मुलाखतीत लक्ष्य सेन म्हणाला, “सर्वचजण निराश होते. सर जे काही म्हणाले याचा मी आदर करतो, त्यामुळे मला खूप मदत झाली. सामन्यानंतर विमल सर आणि प्रकाश सरांनी माझ्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की अनेक गोष्टी मी योग्य केल्या आहेत, पण अशा काही गोष्टी होत्या ज्या मी आणखी चांगल्या प्रकारे करू शकलो असतो.”

हेही वाचा – Sachin Tendulkar: “आचरेकर सरांच्या कर्मभूमीत…” शिवाजी पार्कमध्ये होणार सचिन तेंडुलकरच्या गुरूंचे स्मारक, मास्टर ब्लास्टरने शेअर केली भावुक पोस्ट

दीपिका पदुकोणने लक्ष्य सेनला केला फोन

लक्ष्य सेन या मुलाखतीत बोलताना सांगितले की त्याला दीपिका पदुकोणने म्हणजे प्रकाश पदुकोण यांची मुलीने कांस्यपदकाचा सामना गमावल्यानंतर कॉल केला होता. याबद्दल सांगताना लक्ष्य म्हणाला, त्या सर्वांनीच मला खूप साथ दिली. कांस्यपदकाच्या सामन्यानंतरही तिने मला फोन केला आणि म्हणाली, ‘ठीक आहे; काळजी करू नकोस. तू चांगला खेळला आलेस.’ प्रकाश सर माझ्यासाठी मार्गदर्शक आणि वडिलांसारखे आहेत, मला काही सल्ला हवा असेल किंवा त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायचे असेल तर त्यांच्याशी बोलणे नेहमीच छान असते,” तो म्हणाला.

हेही वाचा: इंग्लंडच्या वर्ल्ड नंबर वन खेळाडूची क्रिकेटधून निवृत्ती, कसोटीमधील कामगिरीबद्दल मनात खंत; पाहा नेमकं काय म्हणाला?

“त्यांनी खरोखर साथ दिली. कांस्यपदकाच्या सामन्यानंतरही तिने मला फोन केला आणि म्हणाली, ‘ठीक आहे; काळजी करू नकोस. तू चांगले केलेस.’ प्रकाश सर माझ्यासाठी मार्गदर्शक आणि वडिलांसारखे आहेत, मला काही सल्ला हवा असेल किंवा त्यांच्याशी बोलायचे असेल कर मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो.” असं लक्ष्य सेन प्रकाण पदुकोण यांच्याविषयी म्हणाला.

नुकताच लक्ष्य सेन दीपिका पदुकोण तिचे कुटुंबीय आणि रणवीर सिंगचे आईबाबा यांच्याबरोबर दिसला होता. एका रेस्टॉरेमधील त्यांचा फोटो समोर आला आहे. तर दीपिकाबरोबर तो रेस्टॉरेंटच्या बाहेर पडत असतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshya sen statement on deepika padukone she called me after bronze medal match said its fine you did good bdg