Manu Bhaker won Bronze medal in Paris Olympics 2024: भारताची स्टार नेमबाज मनू भाकेरने रविवारी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये कांस्यपदकासह भारताला ऑलिम्पिक २०२४मधील पहिलं पदक मिळवून दिलं. नेमबाजीतील भारताची ऑलिम्पिक पदकाची १२ वर्षांची प्रतीक्षा मनूने संपवली. ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. लंडन ऑलिम्पिक २०१२ नंतर नेमबाजीतील भारताचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे. लंडनमध्ये, विजय कुमारने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये रौप्यपदक जिंकले तर गगन नारंगने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live Updates: मनु भाकेरने भारतासाठी जिंकलं पहिल पदक, सुमित नागल ऑलिम्पिकमधून बाहेर

रिओ ऑलिम्पिक २०१६ आणि टोकियो ऑलिम्पिकमधून भारतीय नेमबाज रिकाम्या हाताने परतले होते. हरियाणातील झज्जर येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय मनूने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत २२१.७ गुणांसह तिसरे स्थान पटकावत कांस्यपदक जिंकले. अवघ्या एका गुणाच्या फरकाने मनू तिसऱ्या क्रमांकावर राहिली. मनू दक्षिण कोरियाच्या येजी किमपेक्षा फक्त ०.१ गुणांनी मागे होती जिने अखेरीस २४१.३ गुणांसह रौप्य पदक जिंकले. तर कोरियाच्या दुसरी नेमबाज ये जिन ओहने २४३.२ गुणांच्या ऑलिम्पिक विक्रमी अंतिम गुणांसह सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा – Manu Bhaker : कोण आहे मनू भाकेर? जिने भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीत पहिलं पदक जिंकून दिलं

Manu Bhaker: कांस्य पदक जिंकल्यानंतर काय म्हणाली मनू भाकेर?

भारतासाठी ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक मिळवल्यानंतर मनू भाकेरने डीडी स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हणाली, ‘मी आज भारतासाठी पदक जिंकू शकले याचा मला खूप आनंद आहे. मी माझ्या देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले. हा क्षण खास आहे आणि हे शब्दात मांडण खूप कठीण आहे.

हेही वाचा – IND vs SL: ऋषभ पंतचा अनोखा शॉट, चेंडू गेला सीमारेषेपार तर बॅटलाही उडवलं हवेत… VIDEO होतोय व्हायरल

टोक्यो ऑलिम्पिकबद्दल सांगताना म्हणाली, ‘टोकियो ऑलिम्पिकनंतर मी थोडी निराश झाले होते पण मी माझ्या खेळावर पुन्हा लक्ष केंद्रित केले, मी माझे प्रशिक्षक, माझे कुटुंब आणि माझ्या मित्रपरिवाराची आभारी आहे ज्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले आणि माझे मनोबल ढासळू दिले नाही.’

‘अखेरच्या क्षणी तिच्या मनात काय चालले होते?’ असा प्रश्न मनु भाकेरला विचारताच ती म्हणाली, ‘मी भगवद्गीता मन लावून वाचली आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे, आपण फळ काय मिळेल याचा विचार न करता कर्म करत राहावं. त्यामुळे माझ्या मनात फक्त शूटिंग सुरू होतं आणि मी इतर कशाचाही विचार करत नव्हते. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या देशवासीयांचेही मी आभार मानतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manu bhaker statement after won bronze medal in paris olympics 2024 see how bhagavdgita helped her to win bdg