इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना लॉर्ड्स येथे दोन दिवसापूर्वी सुरु झाला. यात पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने विरोधी संघाच्या धावांचा पाठलाग करताना शतक ठोकले. या शतकानंतर ४२ वर्षीय मिसबाहने एक-दोन नव्हे तर तब्बल १० पुश-अप्स मारले. मिसबाहने क्रिकेटच्या मैदानावर मारलेल्या या पुश-अप्सचा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे.
मिसबाहने इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना शतक ठोकले. आपल्या कारकिर्दीतील दहावे शतक आणि लॉर्ड्सवरील या शतकाचा हा आनंद साजरा करताना मिसबाहने प्रथन त्याचे हेल्मेट काढून प्रेक्षकांसमोर बॅट उंचावली. त्यानंतर त्याने पुश-अप्स मारण्यापूर्वी ड्रेसिंग रुमकडे बघत सॅल्यूट केले. पाकिस्तानच्या या खेळाडूने यावेळी एक-दोन नव्हे तर तब्बल दहा पुश-अप्स मारले. वाढते वय हा केवळ एक आकडा असतो हे मिसबाहच्या या कृतीमुळे सिद्ध झाले. लॉर्ड्सवर मारलेल्या या पुश-अप्सबाबत बोलताना मिसबाह म्हणाला की, जेव्हा कधी मी इंग्लंडविरुद्ध शतक ठोकेन तेव्हा तेव्हा मी दहा पुश-अप्स मारेन असे मी अबोत्ताबाद कॅम्पमधील जवानांना वचन दिले आहे. तसेच माझे हे शतक मी माझ्या पत्नीला समर्पित करतो. मी ज्यावेळी मॅच खेळायला जातो तेव्हा ती नेहमी माझ्यासाठी उपवास करते, असे मिसबाह म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: .. म्हणून मिसबाहने मैदानावर मारल्या दहा पुश-अप्स
क्रिकेटच्या मैदानावर मारलेल्या या पुश-अप्सचा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 17-07-2016 at 13:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Misbah ul haq does push ups after hundred at lords know why