भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर फारच कमी सक्रिय असतो. असे असले, तरीही सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची कमी नाही. हेच कारण आहे, की त्याचे फोटो एका क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक धोनीचा नवा लूक सर्वांसमोर आला आहे. प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट अलीम हकीमने धोनीचा हा नवा लूक केला आहे. यात तो अधिकच तरुण दिसत आहे.

कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला धोनी आपल्या विविध लूकविषयी नेहमी चर्चेत असतो. त्याचे नव्या लूकचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धोनीने आपली हेअरस्टाइल बदलली आहे. धोनीच्या या नवीन लूकचे फोटो हेअरस्टाइलिस्ट अलीम हकीमने शेअर केले आहेत.

 

हेही वाचा – Tokyo 2020 : काय सांगता..! कंडोममुळं ‘तिनं’ जिंकलं मेडल

धोनीचा लूक पाहून चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

 

 

 

 

 

 

धोनीची कामगिरी

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.