विराटनं टेस्ट कॅप्टनशिप सोडली अन् धोनीची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!

विराटनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत कसोटीचं कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली.

विराटनं टेस्ट कॅप्टनशिप सोडली अन् धोनीची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!
महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली

विराट कोहलीने (Virat Kohli) मागील वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर त्याच्याकडून वनडेचे कर्णधारपद हिरावून घेतले. आता विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आणि कसोटी कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. विराटच्या या निर्णयानंतर महेंद्रसिंह धोनीची एक भविष्यवाणी खरी ठरली आहे. विभाजित कर्णधारपद भारतासाठी योग्य नाही हे मान्य करून धोनीने २०१७ मध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

पुण्यात मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला होता, “भारतात विभाजित कर्णधारपद चालत नाही. माझ्यासाठी पुढे जाण्याची हीच योग्य वेळ होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरणार आहे.”

२०१५च्या शेवटी आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध घरच्या वनडे मालिकेतील पराभवापूर्वी, जेव्हा धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका झाली होती, तेव्हा त्याला हे समजले होते की विभाजित कर्णधारपदाची संकल्पना भारतात काम करत नाही. धोनी म्हणाला होता, “मी विभाजित कर्णधारपदावर विश्वास ठेवत नाही. संघासाठी एकच कॅप्टन असावा. भारतात विभाजित कर्णधारपद चालत नाही, मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. विराट कामात सहज असावा अशी माझी इच्छा होती. त्यात कोणताही चुकीचा निर्णय नाही. या संघात तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. मला वाटले की पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे.”

हेही वाचा – “शेवटी धोनीचे खूप आभार, ज्यानं…”, टेस्ट कॅप्टनशिप सोडणाऱ्या विराटनं पोस्टमध्ये केला ‘कॅप्टन कूल’चा उल्लेख!

२०१४-१५मध्ये ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेदरम्यान धोनीच्या अचानक निवृत्तीनंतर विराट कोहली कसोटी कर्णधार झाला. यामुळे विभाजित कर्णधारपदाचा मार्ग मोकळा झाला, परंतु त्यानंतर लहान फॉरमॅटमध्ये भारताला अनुकूल निकाल मिळाले नाहीत. २०१५चा वऩडे आणि २०१६चा टी-२० वर्ल्डकप भारताने गमावला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“शेवटी धोनीचे खूप आभार, ज्यानं…”, टेस्ट कॅप्टनशिप सोडणाऱ्या विराटनं पोस्टमध्ये केला ‘कॅप्टन कूल’चा उल्लेख!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी