मुंबईने हिमाचल प्रदेशवर ४-० असा दणदणीत विजय मिळवित वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आव्हान राखले.
साखळी गटातील एकतर्फी लढतीत मुंबईने पूर्वार्धात २-० अशी आघाडी घेतली होती. त्या वेळी त्यांच्याकडून व्हिक्टोसिंग (१९ वे मिनिट) व मनप्रीतसिंग (२८ वे मिनिट) यांनी हे गोल केले. उत्तरार्धात हरजितसिंग (५२ वे मिनिट) व प्रतीकसिंग (६८ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत मुंबईला सहज विजय मिळवून दिला.
अन्य एकतर्फी लढतीत जम्मू व काश्मीर संघाने गोव्याचा ५-० असा धुव्वा उडविला. त्या वेळी सुरिंदरसिंग व अरमिंदरसिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले. जसप्रीतसिंग व प्रतीककुमार यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्यांना चांगली साथ दिली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2014 रोजी प्रकाशित
मुंबईचा हिमाचल प्रदेशवर दणदणीत विजय
मुंबईने हिमाचल प्रदेशवर ४-० असा दणदणीत विजय मिळवित वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आव्हान राखले.
First published on: 09-03-2014 at 05:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai himachal pradesh hockey