Nathan Lyon 200 Wickets Complete in WTC : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॅले स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एक आश्चर्यकारक घटना पहायला मिळाली, जिथे कांगारू फिरकीपटू नॅथन लायनने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात दिनेश चंडिमलला ट्रॅव्हिस हेडकडे झेलबाद केले. विशेष म्हणजे याच सत्रात श्रीलंकेच्या डावातील पहिल्या सत्रात लायनने त्याला बाद केले होते. अशा प्रकारे एकाच सत्रात एका फलंदाजाला दोनदा बाद करणारा लायन पहिला गोलंदाज ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लॅथन लायने डब्ल्यूटीसीत पूर्ण केल्या २०० विकेट्स –

लंचच्या आधी शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेचा माजी कर्णधार दिनेश चंडिमलची विकेट घेत नॅथन लायनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासातील २००वी विकेट्स घेतली. पहिल्या डावात ७२ धावांची शानदार खेळी करणारा चंडिमल दुसऱ्या डावात ४९ चेंडूत ३१ धावा करून हेडच्या हाती झेलबाद झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २०० विकेट्स घेणारा लायन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

पॅट कमिन्सनेही केलाय हा खास पराक्रम –

त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्सनेही ही कामगिरी केली आहे. गेल्या महिन्यात सिडनी क्रिकेट मैदानावर टीम इंडियाविरुद्ध त्याने ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेटमध्ये तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लायनने पहिल्या डावात श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना बाद केले होते. त्यामुळे स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाने यजमान संघाला अवघ्या १६५ धावांत सर्वबाद करून फॉलोऑन दिला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – २००
नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) – २००*
रविचंद्रन अश्विन (भारत) – १९५
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – १६८
जसप्रीत बुमराह (भारत) – १५६

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे फिरकीपटू :

नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) – २००*
रविचंद्रन अश्विन (भारत) – १९५
रवींद्र जडेजा (भारत) – १३१
जॅक लीच (इंग्लंड) – १०६
केशव महाराज (दक्षिण आफ्रिका) – १०४

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nathan lyon got the wicket of dinesh chandimal twice in a session in a test match rare moment in test history vbm