Neeraj Chopra enters the field from stand to congratulate under19 world cup winning team for their historic win | Loksatta

Neeraj Chopra: ‘जेव्हा गोल्डन बॉय नतमस्तक होतो…’  पहिल्यावहिल्या विश्वचषकातील ऐतिहासिक विजयानंतर मैदानात उतरून केला कौतुकाचा वर्षाव पाहा video

U19 women: टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या अंडर-१९ महिला संघाचे अभिनंदन करण्यासाठी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा मैदानात उतरल्याचा विडियो आयसीसीने शेअर केला आहे.

Neeraj Chopra enters the field from stand to congratulate under19 world cup winning team for their historic win
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

Neeraj Choprasays on U19 women: भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा (दि. २९ जानेवारी) दिवस खूपच महत्त्वाचा ठरला. या दिवशी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला त्यात टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.

भारताचा टोकियो ऑलिम्पिक २०२० चा भालाफेकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा २९ जानेवारी रोजी पॉचेफस्ट्रूममध्ये या अंतिम सामन्यात उपस्थित होता. आयसीसी अंडर-१९ महिला विश्वचषकात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला. आणि पहिल्यावहिल्या विश्वचषकाचा आनंद साजरा केला. हा आनंद याची देही याची डोळा पाहण्यासाठी नीरज चोप्रा स्टेडियम मध्ये उपस्थित होता.

विजयाच्या क्षणी नीरज चोप्रा भारतीय मुलींचे कौतुक करण्यासाठी स्टँडमध्ये हजर होता आणि त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर त्या सुवर्ण क्षणाचा व्हिडिओ कॅप्शनसह शेअर केला आहे.  त्यात तो म्हणतो,  “स्टँडवरून हा क्षण पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे. इतिहास घडवल्याबद्दल अंडर-१९ टीम इंडिया @BCCIWomen चे हार्दिक अभिनंदन #INDvENG #U19T20WorldCup”

विश्वचषकाचा सादरीकरण सोहळा आटोपल्यानंतर नीरजनेही विजेत्या संघाशी संवाद साधण्यासाठी मैदानात प्रवेश केला. त्याने संपूर्ण भारतीय संघासाठी टाळ्या वाजवत कौतुकाचा वर्षाव केला आणि अगदी मनापासून नमस्कार करत अभिवादन केले. आयसीसीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याला १९८३ विश्वचषकावर आधारित चित्रपटातील गाण्याचे म्युसिक बॅकग्राउंडला लावले आहे.

हेही वाचा: Nooshin Al Khadeer: ‘हारकर जीतने वाले को नूशीन कहते हैं!’ अंडर-१९ वर्ल्ड कपची असली ‘चक दे इंडिया’, १८ वर्षापूर्वीचे अधुरे स्वप्न पूर्ण

शफाली वर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय आणि पहिला आशियाई महिला क्रिकेट संघ बनून इतिहास रचला. शफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तितास साधू (२/६) आणि फिरकीपटू अर्चना देवी (२/१७) आणि पार्शवी चोप्रा (२/१३) यांनी इंग्लंडला ६८ धावांपर्यंत रोखले. त्यानंतर काही अडचण येऊन देखील, सौम्या तिवारी (२४*) आणि जी त्रिशा (२४) यांनी विजय सुनिश्चित केला आणि भारतीय संघाने ७ गडी राखून इंग्लंडवर मात केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:43 IST
Next Story
Nooshin Al Khadeer: ‘हारकर जीतने वाले को नूशीन कहते हैं!’ अंडर-१९ वर्ल्ड कपची असली ‘चक दे इंडिया’, १८ वर्षापूर्वीचे अधुरे स्वप्न पूर्ण