‘‘ये इंडिया का नया कप्तान टॉस भी जितेगा और…”, ट्विटरवर रोहितच्याच नावाचा जयजयकार!

रोहितच्या नेतृत्वात भारतानं पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला हरवलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी…

netizens praises indian captain rohit sharma after register first win against new zealand

भारताचा पूर्णवेळ टी-२० कप्तान म्हणून रोहित शर्माने आपल्या खात्यात पहिला विजय नोंदवला. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडला ५ गडी राखून हरवले. भारताच्या विजयात रोहितसोबत मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवचेही योगदान महत्त्वाचे ठरले. या विजयानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाचा सर्वत्र जयजयकार सुरू आहे. आधी टॉस आणि नंतर सामना जिंकल्यानंतर ट्विटरवर रोहितचे कौतुक करण्यात आले.

पाहा नेटकऱ्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्ट

हेही वाचा – टीम इंडियाच्या ‘नव्या’ कॅप्टनवर कार्तिक फिदा; म्हणाला, ‘‘तरुणाई रोहितकडे आकर्षित…”

असा रंगला सामना…

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले तर, रोहितने ४८ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netizens praises indian captain rohit sharma after register first win against new zealand adn

Next Story
टीम इंडियाच्या ‘नव्या’ कॅप्टनवर कार्तिक फिदा; म्हणाला, ‘‘तरुणाई रोहितकडे आकर्षित…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी