PAK vs NZ Match Updates: पाकिस्तानचे क्रिकेट संचालक मिकी आर्थर यांनी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानच्या खराब कामगिरीमागील काही कारणे स्पष्ट केली आहेत. आर्थर यांच्या मते, पाकिस्तानचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत नसल्यामुळे त्यांची भारतात थोडी खेळताना लय गवसत नाहीये. बंगळुरूमध्ये सामनापूर्व पत्रकार परिषदेत बोलताना आर्थर म्हणाले की २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान अजूनही खेळात पुनरागमन करू शकते मात्र त्यांना वेगाने परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज, शनिवारी, ४ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडचा सामना हा पाकिस्तानसाठी करा किंवा मरा असा असणार आहे. पाकिस्तानला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर सामना जिंकावाच लागेल. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू न खेळल्याने गैरसोय झाली आहे का, असे विचारले असता आर्थर म्हणाले की, हे खरंय पण म्हणून ही सबब नाही.

इतर संघांप्रमाणे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग नसल्याने सुद्धा खेळाडूंचे नुकसान झाले आहे असा आरोप आर्थर यांनी केला होता. दोन देशांमधील राजकीय तणावामुळे पाकिस्तानचा संघ आयपीएलमध्ये खेळत नाही. आजवर आयपीएलच्या केवळ पहिल्याच वर्षी पाकिस्तानला सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

हे ही वाचा<< “पाकिस्तानी खेळाडूंना रूममध्ये कठोर.. “, BCCI ला दोष देत पाक टीम डिरेक्टरचं मोठं विधान, म्हणाले, “मानसिक..”

आर्थर पुढे म्हणतात की. “हे सगळं कारण म्हणून सांगत नाही, पण गैरसोय ही झालीच आहे आम्ही ज्या ज्या मैदानावर खेळलो ते प्रत्येक मैदान आमच्यासाठी नवीनच आहे त्यामुळे परिस्थिती स्वीकारून जुळवून घ्यायला वेळ लागतो. पण तरीही खेळाडूंनी ते स्वीकारले आणि खेळाचा आनंद घेतला. त्यांनी टीव्हीवर आयपीएल पाहिलं आहे. ईडन गार्डन्स, बंगळुरू , हैदराबाद, चेन्नई यांसारख्या प्रतिष्ठित मैदानांवर कसोटी सामने पाहिले आहेत. त्यामुळे, त्यांच्यासाठी या मैदानांमध्ये खेळणे सवयीचे नसले तरी रोमांचक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak team director blames ipl for pakistan team bad performance at world cup 2023 says pak can still reach semis wc point table svs