आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) दोन्ही संघ भिडतील. इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव करत तर पाकिस्तानने न्यूझीलंड पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ विजेतेपदासाठी फेव्हरेटपैकी एक मानला जात होता परंतु उपांत्य फेरीत १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. रोहित ब्रिगेडच्या पराभवानंतर, भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी अंतिम फेरीत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासाठी पाकिस्तानला मी पाठिंबा देत आहे

माजी भारतीय यष्टीरक्षक मोरे यांच्या मते, “पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत क्रिकेटिंग राष्ट्र म्हणून खूप त्रास सहन केला आहे, म्हणूनच किरण मोरे यांनी त्यांना विजेतेपदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने यंदा जेतेपद पटकावावे अशी मोरे यांची इच्छा आहे जेणेकरून त्यांच्या क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. सुरक्षेच्या कारणास्तव बड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांनी अनेक वर्षांपासून पाकिस्तानला भेट देण्यास टाळाटाळ केली होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानमध्ये मालिका खेळली आहे.”

हेही वाचा :   PAK vs ENG: ‘जगातील सर्वोतम वेगवान गोलंदाजी…’टी२० विश्वचषक फायनल सामन्याआधी बाबरचे इंग्लंडला आव्हान

स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत मोरे म्हणाले, “पाकिस्तान ज्या प्रकारे क्रिकेट खेळत आहे, जेव्हा तुम्ही त्यांच्या देशाकडे पाहता, तेव्हा त्यांना क्रिकेट बोर्ड म्हणून खूप त्रास सहन करावा लागला आहे. तिथे एकही संघ भेट देत नव्हता. त्याला सामने खेळायला मिळाले नाहीत. मला आशा आहे की पाकिस्तान विश्वचषक जिंकेल. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी इंग्लंडने पाकिस्तानच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केल्यामुळे पाकिस्तानला ट्रॉफी जिंकणे सोपे जाणार नाही, असा विश्वासही मोरे यांनी व्यक्त केला.”

हेही वाचा :   टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज, फिटनेस व्हिडिओ व्हायरल

इंग्लंड एक मजबूत संघ

मोरे म्हणाले, “इंग्लंड क्रिकेट संघ पाकिस्तानात गेला आणि त्यांनी टी२० विश्वचषकात येण्यापूर्वी त्यांना हरवले. इंग्लंड एक मजबूत संघ आहे. जेव्हा मोरे यांना पाकिस्तान संघातून फायनलसाठी प्रभावशाली खेळाडू निवडण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी बाबर आझम आणि त्याचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांचे नाव दिले. दोन्ही खेळाडूंचे कौतुक करताना मोरे म्हणाले, बाबर आझम हा खूप चांगला खेळाडू आहे. तो नेहमी मोठ्या प्रसंगी चांगली कामगिरी करतो. तो बॅकफूटचा उत्कृष्ट खेळाडू आहे. रिझवान हा देखील चांगला क्रिकेटपटू आहे. रिजवान आणि बाबरची जोडी लाजवाब आहे. बाबरचे डोके थंड आहे तर रिझवानला आक्रमक फलंदाजी करायला आवडते. त्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng i hope pakistan wins why ex indian cricketer is supporting babars team find out avw