Video of Pat Cummins and Ben Stokes’ reaction: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांतील ॲशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्डसवर रविवारी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात अनेक वाद पाहिला मिळाले. शेवटच्या दिवशी जॉनी बेअरस्टो बाद होताच परिस्थिती पूर्णपणे बदलली. बेअरस्टोच्या विकेटबाबतही बरेच वाद झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेअरस्टो वादग्रस्तपणे बाद झाला –

बेअरस्टोने कॅमेरून ग्रीनचा बाउन्सर चेंडू सोडत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊ दिला. यानंतर चेंडू ‘डेड’ होण्यापूर्वीच तो क्रीज सोडून दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या आपल्या जोडीदाराकडे गेला, त्याचवेळी यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने चेंडू स्टंपवर मारला. हे पाहून बेअरस्टो हादरला आणि मैदानावरील अंपायरने थर्ड अंपायरकडे बोट दाखवले. रिप्ले पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने त्याला स्टंपिंग आऊट घोषित केले. यानंतर बेअरस्टो निराशेने डोके हलवत पॅव्हेलियनमध्ये परतला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी याबाबत आपापले मत मांडले.

स्टोक्सने ऑस्ट्रेलियाला खिलाडूवृत्तीची आठवण करून दिली –

बेन स्टोक्स म्हणाला, “मला याविषयी माझे कोणतेही मांडायचे नाही. तो आऊट होता तर आऊट होता. जर त्याचा पाय क्रीझच्या आतल्या बाजून असता, तर मी स्वत: अंपायरवर दबाव टाकला असता, त्यांना निर्णय बदलण्यास किंवा पुन्हा विचार करण्यास सांगितले असते. मी अंपायरला विचारले होते की त्यांना षटक संपले असे मानले होते का? ते दोन्ही अंपायर दुसऱ्या बाजूला चालू लागले. जॉनी बेअरस्टो क्रीज सोडून प्रत्येक फलंदाजाप्रमाणे बोलण्यासाठी पुढे आला आणि नंतर कॅरीने त्याला आऊट केले. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना जिंकवून देणारा क्षण होता, पण अशा पद्धतीने सामना जिंकण्यावर मला प्रश्न विचारला तर, माझे उत्तर नाही असेल. मला असे जिंकायला आवडणार नाही.”

पॅट कमिन्सने कॅरीला दिले श्रेय –

त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने स्टोक्सला आठवण करून दिली की, जॉनी बेअरस्टोने स्वत: अनेकदा असे केले होते. तो म्हणाला, “मला वाटतं आम्ही जे केलं ते नियमानुसार होतं. खुद्द जॉनी बेअरस्टोने असे केले आहे. त्याने पहिल्यांदा डेव्हिड वॉर्नरसोबत असे केले आणि नंतर २०१९ मध्ये स्टीव्ह स्मिथही असे शिकरा बनवले होते. हे खूप सामान्य आहे. मी पूर्ण श्रेय अॅलेक्स कॅरीला देऊ इच्छितो ज्याने संधी पाहिली आणि त्याचा फायदा घेतला. हा नियम आहे, काहीजण असहमत असू शकतात पण काल ​ज्या पद्धतीने झेलबद्दल निर्णय घेतला गेला तसाच हा पण होता.”

हेही वाचा – Australia vs England: बेन स्टोक्सने षटकारांच्या हॅट्ट्रिकसह झळकावले वादळी शतक, पाहा VIDEO

सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावाच्या जोरावरऑस्ट्रेलियाला ९१ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २७९ धावा केल्या आणि इंग्लडला ३७१ धावांचे लक्ष्य दिले, परंतु प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३२७ धावांवर गारद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pat cummins and ben stokes react to jonny bairstows wicket in ashes series 2023 vbm