Prime Minister Narendra Modi congratulates Indian athletes: चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारताने बुधवारी पदकतालिकेत मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७० पदके जिंकली होती, परंतु यावेळी भारताने आतापर्यंत ७० हून अधिक पदके जिंकली आहेत. बुधवारी तिरंदाजीत भारताने सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. कारण भारताने पहिल्यांदाच एका हंगामात ७० हून अधिक पदकावर नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधानांनी खेळाडूंचे केले अभिनंदन –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल आपल्या खेळाडूंचे आणि देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पूर्वीपेक्षा अधिक चमकला! ७१ पदकांसह, आम्ही आमची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट पदकतालिका साजरी करत आहोत, जे आमच्या खेळाडूंच्या अतुलनीय समर्पण, धैर्य आणि खिलाडूवृत्तीचा पुरावा आहे. आमचे प्रत्येक पदक कठोर परिश्रम आणि उत्कटतेच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकते. संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण. आमच्या खेळाडूंचे अभिनंदन.”

भारताने ११व्या दिवसाची सुरुवात कांस्यपदकाने केली –

१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ११व्या दिवशी भारताची सुरुवात कांस्यपदकाने झाली. भारतीय मिश्र संघाने ३५ किमी धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. यानंतर तिरंदाजी मिश्र सांघिक कंपाऊंड स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले. भारताला स्क्वॉशमध्ये दिवसाचे तिसरे आणि बॉक्सिंगमध्ये चौथे पदक मिळाले. दोन्ही खेळात कांस्यपदक मिळाले. अशा प्रकारे भारताने ७४ पदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ७४ वर्षांच्या इतिहासातील हा भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम विक्रम आहे. यापूर्वी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने सर्वाधिक ७० पदके जिंकली होती.

हेही वाचा – Asian Games: तिरंदाजीमध्ये ओजस-ज्योती जोडीने सुवर्णपदक जिंकताच भारताने रचला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

महिलांच्या ७५ किलो वजनी गटात लव्हलिना बोर्गोहेनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात तिला चीनच्या लीकडून पराभव पत्करावा लागला. सुरुवातीच्या फेरीत दोघांमध्ये निकराची लढत होती. मात्र, उर्वरित दोन फेऱ्यांमध्ये चीनच्या खेळाडूने चांगला खेळ करत सामना सहज जिंकला. तत्पूर्वी बॉक्सिंगमध्ये प्रवीण हुड्डाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला चायनीज तैपेईच्या लिनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आणि तिचा प्रवास इथेच संपला.

१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत जिंकलेली पदके –

सुवर्ण: १६
रौप्य: २७
कांस्य: ३१
एकूण: ७४

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi felicitated the indian athletes who participated in the 19th asian games 2023 vbm