उबेर चषकातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत महिला एकेरीमध्ये पुन्हा एकदा अव्वल दहांमध्ये स्थान पटकावले आहे. पाच सामने जिंकल्यामुळे सिंधू दहाव्या स्थानावर पोहोचली आहे, तर क्रमवारीत सायना नेहवालने आपले आठवे स्थान कायम ठेवले आहे.
युवा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीमध्ये क्रमवारीत पाच स्थानांची उडी मारत कारकिर्दीतील सर्वोत्तम १३वे स्थान पटकावले आहे. गेल्या स्पर्धेत जर्मनीच्या मार्क झ्विब्लवर विजय मिळवल्यामुळे श्रीकांतच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. पारुपल्ली कश्यपने क्रमवारीतील आपले २१वे स्थान कायम ठेवले आहे. दुहेरीच्या क्रमवारीमध्ये अव्वल २५ जणांमध्ये भारतीय खेळाडूंनी स्थान पटकावता आलेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2014 रोजी प्रकाशित
सिंधू पुन्हा अव्वल दहामध्ये
उबेर चषकातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत महिला एकेरीमध्ये पुन्हा एकदा अव्वल दहांमध्ये स्थान पटकावले आहे.

First published on: 30-05-2014 at 12:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pv sindhu re enters top 10 srikanth climbs to career best