गुडघ्याची दुखापत आणि त्यानंतर पोटाच्या दुखापतीने प्रदीर्घ काळ त्रस्त असणारा राफेल नदाल चिली येथील स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. गेल्यावर्षी विम्बल्डन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत ल्युकास रोसोल याच्याकडून धक्कादायक पराभवानंतर नदालची दुखापत बळावली आणि तेव्हापासून तो कोणत्याही स्पर्धेत सहभागी झालेला नाही. गंभीर दुखापतीमुळे नदाल पुन्हा कोर्टवर उतरू शकणार नाही, अशा अफवांना ऊत आला होता. मात्र या सगळ्या अफवा दूर सारत नदाल चिली येथील स्पर्धेत कोर्टवर उतरणार आहे. दरम्यान नदाल परतणार असला तरी त्याची गुडघ्याची दुखापत अद्याप पूर्ण बरी झालेली नाही. अजूनही गुडघ्यांमध्ये वेदना जाणवते, परंतु कुठून तरी सुरुवात करावीच लागते. परतल्यानंतर सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. गुडघ्यांची साथ मिळाली तर उत्तमच असे नदालने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal will come back