Anvay Dravid: भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड याला कर्नाटकच्या १४ वर्षांखालील संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अन्वय कर्नाटकसाठी ज्युनियर क्रिकेट खेळतो आणि अनेकदा त्याच्या बॅटने केलेल्या कामगिरीमुळे चर्चेत असतो. त्याच्या सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीबद्दल त्याला बक्षीस मिळाले. राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित हे देखील कर्नाटक क्रिकेटमधील एक उदयोन्मुख नाव आहे. त्याच्या फलंदाजीमध्ये त्याच्या वडिलांची झलक आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याने त्याच्या वडिलांकडून नवनवीन क्लुप्त्या शिकल्या आहेत. क्रिकेटशिवाय समितला प्रवास, संगीत आणि पोहण्याचीही आवड आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत चालला पुढे

मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. आम्ही बोलत आहोत राहुल द्रविड आणि त्याचा मुलगा अन्वय द्रविडबद्दल. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी अन्वय द्रविडला कर्णधार बनवण्यात आले आहे. म्हणजे एकीकडे वडील टीम इंडियाचे प्रशिक्षक असतील. दुसरीकडे त्याचा मुलगा संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे. अन्वय हा राहुल द्रविडचा धाकटा मुलगा आहे, त्याचा मोठा मुलगा समित द्रविड आहे. दोन्ही मुले कर्नाटकातील क्रिकेटमध्ये उदयोन्मुख खेळाडू आहेत. अन्वय १४ वर्षांखालील संघासोबत क्रिकेट खेळतो.

हेही वाचा: IND vs NZ 1st ODI: “…नजर न लगे”, भारताच्या ‘या’ माझी दिग्गज समालोचकाने शुबमन गिलची तुलना केली एमएस धोनीशी

विशेष म्हणजे अन्वय हा यष्टिरक्षकही आहे. राहुल द्रविड एकेकाळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पूर्णवेळ यष्टिरक्षकही होता. भारत जेव्हा यष्टिरक्षक-फलंदाजासाठी झगडत होता तेव्हा त्याने हे काम हाती घेतले. मात्र, महेंद्रसिंग धोनीच्या आगमनानंतर द्रविड स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळताना दिसला. मोठा मुलगा समित द्रविड आपल्या वडिलांना आयपीएल दरम्यान क्रिकेट खेळताना पाहत मोठा झाला. दुसरीकडे, धाकटा मुलगा अन्वय याला वडिलांना खेळताना पाहण्याची फारशी संधी मिळालेली नाही. पण, दोन्ही मुलांवर वडिलांच्या क्रिकेट कौशल्याचा आणि बुद्धीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. अन्वय एक यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ओळखला जातो.

अंडर-१४ इंटर-झोनल स्पर्धेत कर्नाटकचा कर्णधार

आता क्रिकेटचा खेळ शिकवणाऱ्या बापासारखा गुरू घरात असेल तर मुलगे या खेळात नक्कीच पारंगत होतील. वडिलांकडून क्रिकेटचे बारकावे शिकलेला अन्वय द्रविड सध्या कर्नाटकच्या १४ वर्षाखालील संघाचा एक भाग आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता त्याला अंडर-१४ इंटर झोनल टूर्नामेंटमध्ये कर्नाटक संघाचा कर्णधार बनवण्यात आला आहे. अन्वयची क्रिकेट कारकीर्द अजून नवीन आहे. तो आपल्या वडिलांच्या विक्रमांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करेन. अन्वयचा मोठा भाऊ समित हा देखील क्रिकेटपटू आहे. समितने २०१९/२० हंगामात १४ वर्षांखालील स्तरावर दोन द्विशतके झळकावून मथळे मिळवले. समितने याआधीच अंडर-१४ स्तरावर नाव कमावले आहे आणि अन्वयने आता स्पर्धेत त्याच्यासाठी काम केले आहे.

हेही वाचा: Wrestlers Protest: ब्रिजभूषण सिंह कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार? २२ जानेवारीच्या एजीएम बैठकीनंतर घेणार निर्णय

अन्वय-समित ही जोडी फलंदाजीत जबरदस्त आहे

दोन वर्षांपूर्वी अंडर-१४ इंटर-झोनल स्पर्धेत कर्नाटक संघाचा कर्णधार बनलेल्या अन्वयने त्याचा मोठा भाऊ समितसह धडाकेबाज खेळी खेळली होती. हा सामना BTR शील्ड अंडर १४ शालेय स्पर्धेचा होता, ज्यामध्ये दोन भावांमध्ये द्विशतकी भागीदारी झाली होती, ज्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज अन्वयने ९० धावा केल्या होत्या. दोन्ही भावांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या शाळेला स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid son rahul dravids younger son became the captain of the karnataka team a great batsman like his father avw